Pune News : चक्क बिल्डरची या व्यक्तींनी केली कोट्यवधीत फसवणूक, काय आहे प्रकार

Pune crime news : पुणे येथील विकासकाची काही व्यक्तींनी मिळून फसवणूक केली आहे. ही फसवणूक कोट्यवधी रुपयांची आहे. 24 मे दरम्यान घडलेल्या या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : चक्क बिल्डरची या व्यक्तींनी केली कोट्यवधीत फसवणूक, काय आहे प्रकार
| Updated on: Sep 03, 2023 | 1:49 PM

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील भोसरीत फसवणुकीचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. नेहमी ग्राहकांची बिल्डरकडून फसवणूक होते. आता बिल्डरची काही व्यक्तींनी फसवणूक केली आहे. फसवणुकीचा हा प्रकार कोट्यवधी रुपयांचा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 24 मे रोजी घडलेल्या या प्रकरणाचा गुन्हा आता दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी सुरु करणार आहे. प्रमोद रायसोनी या प्रकरणातील आरोपी आहे. त्यांच्यावर यापूर्वी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

कोणी केला फसवणुकीचा प्रकार

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय 53) यांची फसवणूक केली आहे. प्रशांत मणिलाल संघवी (55), संदेश मिश्रीलाल चोपडा (54), प्रमोद भाईचंद रायसोनी या तिघांनी मिळून त्यांची 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांमध्ये फसवणूक झाली आहे.

कशी केली फसवणूक

प्रदीप पोपटलाल कर्नावट (53) यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये दुकाने बांधण्याचा व्यवसाय प्रशांत मणिलाल संघवी (55), संदेश मिश्रीलाल चोपडा (54), प्रमोद भाईचंद रायसोनी यांनी सुरु केला. परंतु या प्रकल्पातील 62 दुकाने रायसोनी, चोपडा, संघवी यांनी आपल्या नावावर केल्या. भोसरीत 24 मे रोजी हा प्रकार समोर आला. त्यानंतर आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 11 कोटी 24 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे.

कोण आहे प्रमोद रायसोनी

भाईचंद हिराचंद पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी आहे. त्यांच्या पुणे येथील घोले रोड शाखेमध्ये बेनामी खात्यांद्वारे एक हजार ६०७ कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार झाला होता. राज्याच्या सहकार विभागाने केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला होता. तसेच अनेक ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये मुदत संपल्यानंतर परत केले गेले नाही. या प्रकरणात प्रमोद रायसोनी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पुणे येथे ठेविदारांची फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. तसेच या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती.