‘…हा तर गोपनीयतेचा भंग’, Tejas More विरोधात Pravin Chavan यांची पोलिसांकडे धाव

सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांनी पुण्यातील शिवाजीनगर (Shivaji nagar) पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली आहे. तेजस मोरेविरोधात शिवाजीनगर पोलिसांत ही तक्रार देण्यात आली आहे.

'...हा तर गोपनीयतेचा भंग', Tejas More विरोधात Pravin Chavan यांची पोलिसांकडे धाव
प्रवीण चव्हाण
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 10:27 AM

पुणे : सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांनी पुण्यातील शिवाजीनगर (Shivaji nagar) पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली आहे. तेजस मोरेविरोधात शिवाजीनगर पोलिसांत ही तक्रार देण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेन ड्राइव्ह हा तेजस मोरे यानेच पुरवला, असा आरोप चव्हाणांनी केला आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर तेजस मोरेचा शोध पोलीस घेतात का, हे पाहावे लागेल. जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप नुकताच केला होता. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावे पुढे येणार आहेत. तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षांकडे होते. मग ते गप्प का होते, असा सवाल त्यांनी टीव्ही 9शी बोलताना केला.

‘व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता’

व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर चौकशीनंतर सर्व गोष्टी पुढे येतील, थोडा वेळ द्या. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री किंवा सरकारकडून माझ्याशी काही बोलणे झालेले नाही. या प्रकरणात एक माजी पत्रकार आणि एक कॉन्स्टेबलही सहभागी आहे. लवकरच त्यांची नावे समोर येतील, असा दावाही चव्हाण यांनी केला होता. माझा सरकारशी आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नसल्याचेही चव्हाण म्हणाले होते.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी’

आता या सर्व प्रकरणावर प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. गोपनीयतेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला असून शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे, असे म्हणत त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस आता काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.

आणखी वाचा :

पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह मिळणार नवीन टर्मिनल इमारत; एएआयकडून बांधकामाला सुरुवात; आता गर्दी होणार नाही

Pune crime| पुण्यात शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; पीडित गायब मुलगी सापडली चित्रा वाघ यांची माहिती

पुण्यात तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा; Warje Police ठाण्यात चेअरमन, सेक्रेटरीविरोधात गुन्हा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.