AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्राचा राजीनामा दिला, पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीला सोपवणार; दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा

फडणवीसांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती. फडणवीसांच्या या आरोपांना आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी फडणवीसांची मागणी फेटाळून लावत हे प्रकरण सीबीआय ऐवजी सीआयडीकडे देण्याची घोषणा केलीय.

प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्राचा राजीनामा दिला, पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीला सोपवणार; दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा
दिलीप वळसे-पाटील, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
| Updated on: Mar 14, 2022 | 6:55 PM
Share

मुंबई : गिरीश महाजन (Girsih Mahajan) आणि विरोधकांना विविध प्रकरणात गोवण्यासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकार षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेती व्हिडीओ बॉम्ब टाकला. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचा समावेश आहे. फडणवीसांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती. फडणवीसांच्या या आरोपांना आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी फडणवीसांची मागणी फेटाळून लावत हे प्रकरण सीबीआय ऐवजी सीआयडीकडे देण्याची घोषणा केलीय.

‘आपण एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली काय?’

फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना वळसे-पाटील म्हणाले की, आपण भाषण करत असताना सांगितलं की स्टिंग ऑपरेशन झालं. ते 125 तासांच आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे येतील असं तुम्ही सांगितलं. मला माहिती आहे की तुम्ही काहीच डाटा अध्यक्षांकडे दिलाय, अजून बराच तुमच्याकडे बाकी आहे. त्यात जशी जशी गरज लागेल तसं तुम्ही काढाल न काढाल मला माहिती नाही. मात्र, मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की, तुमचा आरोप काही जरी असला तरी मी कुणाची पाठराखण करणार नाही. परंतु हे प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. या घटनेच्या मागे नक्की कोण आहे? आणि ही घटना कशाप्रकारे पुढे घेऊन जायची? यात कोण दोषी आहे? त्यांच्यावर काय कारवाई करायची? पण मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना 33 हजार विहिरींचा जलयुक्त शिवारचा पेन ड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात आपण एक 6.5 चा पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी एक पेनड्राईव्ह दिला. आज एक पेनड्राईव्ह दिला. आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?, असा खोचक सवालही वळसे-पाटील यांनी फडणवीसांना विचारलाय.

‘पेन ड्राईव्ह’ प्रकरण सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची माहिती

तसंच फडणवीस साहेबांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आपण करणार. या प्रकरणी कुणाला पाठिशी घातलं जाणार नाही. या प्रकरणात जे वकील आहे ते वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिलाय. तो आम्ही स्वीकारला आहे. या प्रकरणाची चौकशी आम्ही सीआयडीकडे देण्याचं जाहीर करतो. या तपासानंतर संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समोर येईल अशी मला अपेक्षा आहे, अशा शब्दात वळसे-पाटील यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिलंय.

इतर बातम्या :

राजकीय आंदोलनातील केसेस मागे घेणार; दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’, नाना पटोलेंचं ट्वीट! 2024 ला सर्वाधिक जागा जिंकण्याचाही दावा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.