Pune crime| पुण्यात शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; पीडित गायब मुलगी सापडली चित्रा वाघ यांची माहिती

Pune crime| पुण्यात शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; पीडित गायब मुलगी सापडली चित्रा वाघ यांची माहिती
चित्रा वाघ

पीडित तरुणी गायब झाली होती. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर व्हिडीओद्वारे पोलीस प्रशासन व राज्य सरकार ताशेरे ओढले होते. त्यानंतर 2 दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली. काल रात्री तिचा फोन मला आलेला. इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते... पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयंचे चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 16, 2022 | 6:26 PM

पुणे – शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik)यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसतेय. कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित तरुणी गायब झाल्याचा आरोप करत भाजपने (BJP) हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहेत. शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर कुचिक यांनी जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा आरोप करत कुचिक यांच्यावर 17  फेब्रुवारीला पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station)बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीमध्ये पीडित युवतीने गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला.

गायब मुलगी सापडली

त्यानंतर पीडित तरुणी गायब झाली होती. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर व्हिडीओद्वारे पोलीस प्रशासन व राज्य सरकार ताशेरे ओढले होते. त्यानंतर 2 दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली. काल रात्री तिचा फोन मला आलेला. इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते… पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयंचे चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

महिला आयोगाने घेतली दखल

दरम्यान या घटनेची महिला आयोगानेही दखल घेतली असून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

बदनामीच कट

या प्रकरणी माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार असल्याचं स्पष्टीकरण रघुनाथ कुचिक यांनी दिलं आहे . तसेच याबाबत पुणे सायबर पोलिसांकडे तक्रारही केली आहे.मात्र या प्रकरणाचा गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलीस आणि कुचिक यांनी पुढे येऊन आपली बाजू मांडण्याची गरज आहे. अन्यथा प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढणार आहे, स्पष्ट होत आहे.

विदर्भ मराठावाड्यासंदर्भात Ajit Pawar यांनी काहीचं उत्तर दिलं नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं टीकास्त्र

IPL 2022: ऑरेंज कॅपसाठी यंदा चार भारतीय आणि एका परदेशी खेळाडूमध्ये दिसेल चुरस

सेन्केक्स 1000 पेक्षा अधिक अंकांनी वधारला; निफ्टी 17 हजारांच्या पातळीवर बंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें