लेकाला फिट्स येतात, वडिलांना डोळ्यासमोर गमावले, पुणेकर महिला ढसाढसा रडली

डीजेच्या आवाजाविरोधात बोलले तर मैत्रिणी बोलणे बंद केले, सोसायटीने वाळीत टाकले, वडिलांना डोळ्या देखत प्राण गमावताना पाहावे लागल्याचे पुणेकर वर्षा कदम यांनी अश्रू ढाळत सांगितले.

लेकाला फिट्स येतात, वडिलांना डोळ्यासमोर गमावले, पुणेकर महिला ढसाढसा रडली
Varsha kadam
| Updated on: Sep 06, 2026 | 8:30 PM

पुण्यातील जगप्रसिद्ध गणेशोत्सव यंदा डीजे आणि लाऊड स्पिकरच्या ध्वनी प्रदुषणाने गाजत आहे. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेत डीजे विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना पाठींबा मिळू लागला. आणि त्यानंतर गणेश मंडळांनी बापट यांच्या विरोधात रान पेटवले आहे. विद्यानंद बापट हे टीव्ही 9 शी बोलत असताना चव्हाण या गणेशभक्ताने त्यांच्या कानशिलात लगावल्याने हे प्रकरण तापले आहे. त्यानंतर आज पुणेकरांनी डीजे विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाला बापट मात्र हजर राहिले नाही. या मोर्चात पुणेकर महिलेने टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली व्यथा मांडली.

आमच्या सोसायटीत डीजे विरोधात बोलू देत नाहीत. म्हणून आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे वर्षा कदम यांनी सांगितले. मुलाला फिट्स येतात आणि वडील आजारी असल्याने पहिल्या मजल्यावर घर घेतले होते. मात्र, आता मला घर विकण्याचा सल्ला दिला जात आहे. वडिलांना त्रास होतोय म्हणून दहा वर्षे वडिलांच्या खोलीची खिडकी उघडली नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला त्रास होतो म्हणून डीजे विरोधात बोललो तर धर्माच्या विरोधात बोलता असा आरोप केला जातो असेही त्या म्हणाल्या.

डीजे विरोधात बोलतो म्हणून आम्हाला वाळीत टाकले आहे. मैत्रिणींनी बोलले बंद केले आहे. डीजेचा इतरांनाही त्रास होतो, पण ते बोलत नाहीत. त्यांनाही वाटतं त्यांनाही वाळीत टाकलं जाईल. घर शिफ्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आजारपण, लहान मुलाचं कारण दिलं तरी ते ऐकत नाहीत असेही वर्षा कदम म्हणाल्या..

डीजे लावल्यानंतर भिंतींना कंप सुटतो

गणपती उत्सव आणि इतर कार्यक्रमाला मी जात नाही. डीजे लावल्यानंतर भिंतींना कंप सुटतो. माझ्या मुलाला 5 वर्षांपासून फिट्सचा त्रास आहे. पाच वर्षांपासून मुलाला हा त्रास आहे. दहा वर्षे आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. गणपतीच्या दिवसांमध्ये आम्ही बाहेर जायचो किंवा आठव्या मजल्यावर जाऊन झोपायचो, तिथं रिफ्युजी एरिया आहे, लाईट आणि मच्छरचा त्रास होत होता असेही त्या म्हणाल्या.

त्यांना सुखाने राहू द्यायला हवे होते…

वडील आजारी असल्याने त्यांना इथं आणलं होतं. रुग्णालयात उपचार करून ऑक्सिजन लावला होता. दहा वर्षे झालं खिडकी उघडली नाही. आधी नाशिकला नेलं, नंतर पुण्यात आणलं. नवरात्रीचा कार्यक्रम सुरू होता. साऊंड सिस्टीमचा आवाज कमी जास्त करत होते. आवाज कमी करा म्हणून सांगत होते, वडिलांची तब्येत बरी नाही अशी आम्ही विनवणी करत होतो. अखेर मी वडिलांना गावाला घेऊन गेले, गावाला गेल्यानंतर दोन दिवसात त्यांचं निधन झालं. माझ्यासमोर वडिलांनी प्राण सोडले. त्यांना सुखाने राहू द्यायला हवे होते. त्यांना इथं राहू दिलं असतं तर लवकर दवाखान्यात नेता आले असते असे अश्रू ढाळीत वर्षा कदम यांनी सांगितले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us