AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | सायबर भामट्यांचा रडारवर IAS, IPS अधिकारी, फोन करुन…

Pune Crime | सायबर भामटे विविध प्रकारे फसवणूक करत असतात. सर्वसामान्यांप्रमाणे उच्च शिक्षित लोकांनाही हे सोडत नाहीत. आता सायबर चोरट्यांचा रडारवर आयएएस, आयपीएस अधिकारी आले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात...

Pune Crime | सायबर भामट्यांचा रडारवर IAS, IPS अधिकारी, फोन करुन...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 06, 2023 | 12:17 PM
Share

पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : राज्यात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपासून राज्यातील सायबर पोलिसांकडे फसवणूक झाल्याच्या तक्रारी झपाट्याने वाढल्या आहेत. या फसवणूक प्रकरणात सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे उच्च शिक्षित लोकही अडकलेले आहेत. कधी ओटीपी घेऊन तर कधी मोबाईल हॅक करुन, कधी टास्ट देऊन फसवणूक केली जाते. आता या भामट्यांचा रडारवर आयएएस आणि आयपीएस अधिकारी आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा नावाचा वापर त्यासाठी केला गेला आहे.

काय आहे प्रकरण

पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी करुन फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर फोन आला. त्यात आपण जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे म्हटले. माझा माझा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात आहे. परंतु त्याची बदली झाली आहे. यामुळे त्याचे जुने फर्निचर विकायचे आहे. स्वस्तात फर्निचर देणार असल्याचे आमिष दाखवून ७० हजार रुपये घेतले. परंतु फर्निचर मिळालेच नाही.

पोलिसांत गुन्हा दाखल अन्…

तक्रारदारने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. या प्रकरणात एकूण सात जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले. तेव्हा हा प्रकार राजस्थानमधून घडल्याचे समोर आले. पुणे पोलीस राजस्थानला पोहचले. त्या ठिकाणावरुन शाहरूख काटुला खान (वय २३, अलवर, राजस्थान) याला अटक केली.

अधिकाऱ्यांनी केले जनतेला सावध

दरम्यान या प्रकरणानंतर आपल्या नावाचा वापर करुन फसवणूक होत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेला सावध केले आहे. या प्रकारच्या फोनवरुन येणाऱ्या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी राजेश देशमुख यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते.

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...