Pune Gold Rate | सोन्याची झळाळी कायम, पुण्यात आजही सोनं 50 हजारांच्या पुढेच, चांदीही वधारली

काल 50 हजारांच्या पुढे गेलेल्या सोन्याने आजही आपला दर कायम ठेवला आहे. पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 50 हजार 400 रुपये आहे. काल हा दर 50 हजार 160 रुपयांवर होता. त्यात काहीशी वाढ झाल्याचं चित्र आहे.

Pune Gold Rate | सोन्याची झळाळी कायम, पुण्यात आजही सोनं 50 हजारांच्या पुढेच, चांदीही वधारली
Gold-Silver-Price
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 12:02 PM

पुणे : काल 50 हजारांच्या पुढे गेलेल्या सोन्याने आजही आपला दर कायम ठेवला आहे. पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 50 हजार 400 रुपये आहे. काल हा दर 50 हजार 160 रुपयांवर होता. त्यात काहीशी वाढ झाल्याचं चित्र आहे. यासोबत 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ होऊन प्रतितोळा दर 46,140 रुपयांवर गेलं आहे. (The price of gold is still stable at Rs 50,000 Like yesterday in Pune)

काही दुकानांमध्येही ऑनलाईन सोन्याचा दर हा 50 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. याठिकाणी ऑनलाईन सोन्याचा प्रतितोळा दर हा 49 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 720 रुपये आहे.

चांदीच्या दरात पुन्हा 800 रुपयांची वाढ

गेले दोन दिवस घसरत चाललेले चांदीचे दर आज पुन्हा वाधारल्याचं चित्र आहे. एका दिवसांत चांदीच्या दरात 800 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज पुण्यात चांदीचा दर प्रतिकिलो 63 हजार 800 रुपये आहे. काल हा दर 63 हजार रुपये प्रतिकिलो होता. गेले दोन दिवस प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली होती.

हॉलमार्किंगसाठीची मुदत वाढवली जाण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हॉलमार्किंगसाठीची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि सराफ व्यापाऱ्यांमध्ये शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सोन्याच्या दागिने हॉलमार्क करुन घेण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

16 जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच हॉलमार्किंग केंद्रांची संख्याही मर्यादित असल्याने दागिने हॉलमार्क करुन घेण्यासाठी सराफ व्यापाऱ्यांना बराचकाळ तिष्ठत राहावे लागत होते. त्यामुळे देशभरातील सराफ व्यापारी प्रचंड नाराज होते. हॉलमार्किंगचा निषेध करण्यासाठी 23 ऑगस्टला सोन्याचे व्यवहार आणि ज्वेलर्स बंद ठेवून प्रतिकात्मक आंदोनलही करण्यात आले होते. ज्वेलर्स व्यावसायिकांच्या देशभरातील 350 संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता.

इतर बातम्या :

पुढील महिन्यापासून PF नियमात बदल, लगेच माहिती तपासा अन्यथा तुम्हाला EPFचे पैसे मिळणार नाही

Bank Holidays in September 2021: बँकेतील महत्त्वाची कामं वेळेत आटपा, सप्टेंबर महिन्यात देशभरात 12 बँक हॉलिडे

PMJDY: 43.04 कोटी जन धन बँक खाती 7 वर्षांत उघडली, जाणून घ्या त्यांच्यात किती पैसे जमा?