AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील महिन्यापासून PF नियमात बदल, लगेच माहिती तपासा अन्यथा तुम्हाला EPFचे पैसे मिळणार नाही

तर तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात क्रेडिट करू शकणार नाही. वास्तविक कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (EPFO) 1 सप्टेंबर 2021 पूर्वी यूएएन क्रमांकाशी आधार जोडणे आवश्यक आहे.

पुढील महिन्यापासून PF नियमात बदल, लगेच माहिती तपासा अन्यथा तुम्हाला EPFचे पैसे मिळणार नाही
पीएफ
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 28, 2021 | 10:28 AM
Share

नवी दिल्ली : नोकरदार लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात 1 सप्टेंबरपासून जर तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) तुमच्या आधार कार्डाशी जोडलेला नसेल, तर तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात क्रेडिट करू शकणार नाही. वास्तविक कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (EPFO) 1 सप्टेंबर 2021 पूर्वी यूएएन क्रमांकाशी आधार जोडणे आवश्यक आहे.

पीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य

सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 142 अंतर्गत पीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचा आधार तुमच्या UAN शी जोडलेला नसेल तर तुमचा नियोक्ता (काम करत असलेली कंपनी) तुमच्या EPF खात्यात मासिक PF योगदान जमा करू शकणार नाही. तसेच जोपर्यंत लिंकिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकणार नाही किंवा तुमच्या EPF कॉर्पसमधून पैसे काढू शकणार नाही.

तर ईपीएफओ सेवांचे लाभ उपलब्ध होणार नाहीत

जर या नियमाचे पालन केले नाही तर, नियोक्त्याकडून मासिक ईपीएफ योगदान न मिळाल्यामुळे ईपीएफओच्या इतर काही सेवा देखील मिळू शकणार नाहीत. यामुळे पेन्शन फंडातील तुमच्या योगदानावरही परिणाम होईल. सेवानिवृत्ती निधीचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड भविष्य निर्वाह निधी खात्याशी जोडणे अनिवार्य आहे. ईपीएफओने जूनमध्ये इलेक्ट्रॉनिक चालान आणि रिटर्न (ईसीआर) दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केलाय. ज्या कर्मचाऱ्यांचे आधार यूएएनशी जोडलेले आहे, त्यांनी फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच ईसीआर भरण्याची परवानगी दिलीय.

ईपीएफओने काय सांगितले?

ईपीएफओने नियोक्त्यांना सेवांच्या अखंड प्रवेशासाठी आधार यूएएनशी जोडलेले असल्याची खात्री करण्यास सांगितले. जर यूएएनशी आधार लिंक न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात रक्कम जमा झाली नाही तर ते त्या रकमेवरील व्याजही गमावतील.

लिंक कशी करायची ते जाणून घ्या?

>> आधी तुम्ही EPFO ​​च्या अधिकृत वेबसाईटवर जा. >> यासाठी या लिंकवर क्लिक करा, https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ >> यानंतर आता तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. >> मग आता तुम्हाला मॅनेज विभागात केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. >> आता तुम्हाला ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्यासाठी अनेक कागदपत्रे दिसतील. >> तुम्ही आधार पर्याय निवडा आणि आधार कार्डवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे नाव टाईप केल्यानंतर सेवावर क्लिक करा. >> यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित असेल आणि तुमचे आधार UIDAI च्या डेटासह पडताळणी केली जाईल. >> तुमचे KYC दस्तऐवजबरोबर असल्यास तुमचे आधार तुमच्या EPF खात्याशी जोडले जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधार माहितीसमोर “Verify” लिहिलेले मिळेल.

संबंधित बातम्या

PHOTO | वाईट काळातही उपयुक्त ठरेल तुमचे ई-श्रम कार्ड, मिळतील लाखोंचे फायदे

डिसेंबरपर्यंत येऊ शकते आरबीआयची स्वतःची क्रिप्टोकरन्सी! गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान

Changes in PF rules from next month, check the information immediately otherwise you will not get EPF payment

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?