दुपारी हसत, खेळत होते अन् रात्री पत्नी, मुलाचा खून करुन अभियंत्याने हे काय केले

| Updated on: Mar 24, 2023 | 2:20 PM

सुदिप्तो यांनी पत्नी, मुलाचा खून करुन आत्महत्या करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांच्या किचनमध्ये कॉफीचा मग व ज्यूस आढळून आले.

दुपारी हसत, खेळत होते अन् रात्री पत्नी, मुलाचा खून करुन अभियंत्याने हे काय केले
Follow us on

पुणे : पत्नी आणि मुलाचा खून करुन संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात बुधवारी घडली. सुदीप्तो गांगुली असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. त्याने आधी पत्नी आणि मुलाचा खून केला. त्यानंतर घरात गळफास घेतला. दुपारी हसत खेळत सोसायटीत वावरणाऱ्या अभियंत्याने रात्री आत्महत्या का केली? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे उच्चशिक्षित तरुणांचा आत्महत्येचा प्रश्न गंभीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुदिप्तो चंद्रशेखर गांगुली (४४)हा आयटी अभियंता. त्याचे लग्न प्रियांका सुदिप्तो गांगुली (४०) हिच्याशी झाले होते. दोघांना तनिष्क सुदिप्तो गांगुली (८) हा मुलगा होता.सुदिप्तो मंगळवारी दुपारी ३ वाजता बाहेरुन आला. सोसायटीत आल्यावर हसत हसत हात हलवत गेल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तो ज्या नताशा सोसाटीत राहतो, त्या सोसायटीतील लोकांनाही या घटनेमुळे धक्का बसला.कारण सुदिप्तो याचा स्वभाव खेळकर होता. तो असे काही करेल, याची कल्पनाही कोणाला आली नाही.

हे सुद्धा वाचा

सुदिप्तो यांनी पत्नी, मुलाचा खून करुन आत्महत्या करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांच्या किचनमध्ये कॉफीचा मग व ज्यूस आढळून आले. एक इंजेक्शनची सीरींजही पोलिसांना सापडली. हे सर्व पाहिल्यावर त्याने हा प्रकार अगदी ठरवून केला असेल, असे दिसते. त्याने पत्नी व मुलाला कॉफी किंवा ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले असणार, त्यानंतर ते बेशुद्ध झाल्यावर त्यांचा खून केला असण्याची शक्यता आहे.

घराला आतून कुलूप


सुदिप्तो पत्नी व मुलासह घरातच होता. परंतु त्यानंतरही त्याने लोखंडी दरवाजाला कुलूप लावले होते. त्यामुळे तो घरात नसल्याचे सर्व जणांचा समज झाला होता. घरातच ग्रीलच्या दरवाजाच्या कुलुपाची चावी मिळाली. तेव्हा आतूनच ग्रीलमध्ये हात खालून बाहेरुन दरवाजा लावता येत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

नेमके काय घडले


सुदिप्तो यांचा लहान भाऊ सिद्धार्थो बंगळूर येथे राहतो. त्याने मंगळवारी सुदिप्तोशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे सिद्धार्थो याने त्याचा मित्राला सुदिप्तोच्या घरी पाठवले. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली.

पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आयटी इंजिनिअरने तिचा खून करुन केली आत्महत्या