AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या जर्सीत थिरकलेली ‘ही’ तरुणी कोण? सोशल मीडियावर होतेय तिच्या डान्सची चर्चा

IND vs USA च्या मॅच दरम्यान स्टेडियममध्ये डान्स करणारी ती मुलगी कोण? जिच्या डान्सची देशभरात सुरु आहे चर्चा.

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या जर्सीत थिरकलेली 'ही' तरुणी कोण? सोशल मीडियावर होतेय तिच्या डान्सची चर्चा
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 09, 2026 | 1:17 PM
Share

Tanvi Gadkari : मुंबईस्थित अभिनेत्री, नृत्यांगना आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर तन्वी गडकरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. भारत विरुद्ध अमेरिका ICC टी-20 विश्वचषक 2026 सामन्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तिने केलेला उत्स्फूर्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ खास ठरण्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची शानदार बॅटिंगनंतर स्टेडियममधील जल्लोष टिपताना कॅमेऱ्याची नजर थेट तन्वीवर पडली. भारतीय संघाची जर्सी घालून प्रेक्षकांमध्ये उभी राहून ती आनंदाने थिरकत असल्याचं दृश्य थेट लाईव्ह टीव्हीवर दाखवण्यात आलं. तिची ऊर्जा, आनंद आणि आत्मविश्वास पाहून अनेक प्रेक्षकांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.

‘हा माझा पहिलाच लाईव्ह क्रिकेट सामना होता’

तन्वी गडकरीने स्वतः हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, ‘हा माझ्या आयुष्यातील पहिलाच क्रिकेट सामना होता, जो मी थेट स्टेडियममध्ये पाहिला. लाईव्ह मॅचदरम्यान कॅमेरा मला डान्स करताना टिपेल याची कल्पनाही नव्हती’ असं तिने म्हटलं. हा क्षण तिच्या चाहत्यांसाठीही खास ठरला असून व्हिडीओवर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

तन्वी गडकरीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओमधून केली. ‘कॅम्पस बीट’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये तिने साकारलेली रिहाना ही भूमिका विशेष गाजली आणि तिला चांगली ओळख मिळाली. याशिवाय तिने ‘जमनापार’सारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

डान्सिंग टॅलेंटमुळे सोशल मीडियावर लोकप्रियता

अभिनयासोबतच तन्वीचा डान्सिंग टॅलेंट तिची खरी ताकद ठरली आहे. अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये तिने आपल्या नृत्यकौशल्याचं प्रभावी प्रदर्शन केलं असून, सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

तन्वी गडकरीला तिच्या डान्स रील्स, लाइफस्टाइल पोस्ट्स आणि ब्रँड कोलॅबोरेशन कंटेंटसाठी ओळखलं जातं. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून तिची डिजिटल लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.

तन्वीच्या करिअरची खास बाब म्हणजे, ती केवळ अभिनेत्री नाही तर एक यशस्वी डिजिटल कंटेंट क्रिएटर देखील आहे. नियमितपणे डान्स रील्स, फॅशन आणि लाइफस्टाइल व्हिडीओ शेअर करत तिने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....