पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या माजी आमदाराची तयारी

| Updated on: Apr 23, 2023 | 12:17 PM

pune lok sabha election medha kulkarni : पुणे लोकसभा पोटनिवडणूक अजून जाहीर झालेली नाही. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये चर्चेचे पीक जोरात आहे. आता भाजपच्या माजी आमदाराने यासंदर्भात पक्षाने जबाबदारी दिली तर आपण घेण्यास तयार असल्याचे सांगितले.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या माजी आमदाराची तयारी
bjp flag
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेस बोरसे, पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. भाजपमध्ये पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काही नावांची चर्चा सुरू आहे. त्यानंतर भावी खासदार म्हणून बॅनरही लावण्यात आले. आता भाजप कुणाच्या गळ्यात निवडणुकीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपबरोबर काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी चालवली आहे.

भाजपची ही नावे चर्चेत

हे सुद्धा वाचा

गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे या नावांवर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. संजय काकडे, मेधा कुळकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत. जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. त्यांचे पुणे शहरात भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. त्यावरुन टीकाही झाली होती. या सर्व प्रकरणात भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणतात मेधा कुळकर्णी

गिरीश बापट यांच्या निधनातून भाजप अजून सावरलेला नाही. या परिस्थितीत ही चर्चा सुरु करणे असंवेदनशील आहे. या निवडणुकीबाबत माझी कोणाशी चर्चा झाली नाही. आमचे वरिष्ठ नेते यासंदर्भात जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पक्षाने २०१९ मध्ये जो निर्णय घेतला तो मला मान्य होता. आता पक्ष जो निर्णय देईल, मला मान्य आहे. पक्षाने आजपर्यंत मला जी जबाबदारी दिली ती मी योग्य पद्धतीने पार पाडली आहे.

पक्ष जे सांगेल ती मी करेन

राजकीय चर्चांमध्ये माझे नाव येत आहे. परंतु माझ्यात क्षमता आहे आणि मी ते पेलू शकेल, असे पक्षाला वाटेल तर अन् पक्षाने मला जबाबदारी दिली तर मी तयार आहे. माझी इच्छा कोथरुडमधील आहे. या भागातील लोकांशी माझे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. गेल्या काही काळात मी या लोकांपासून दूर गेले. आता पुन्हा त्यांच्या जवळ जाण्याची आपली इच्छा आहे. परंतु मी पुन्हा सांगते, पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडणार आहे. पक्षाला वाटले आणि त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी दिली तर आपली तयारी असणार आहे, असे माजी आमदार व भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.