शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणाच्या नावाखाली फसवणूक, कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा?

| Updated on: Apr 21, 2023 | 12:20 PM

Pune News : पुणे शहरात फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक शिक्षणाच्या नावाखाली करण्यात आली आहे. यामध्ये शेकडो युवकांना फसवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण ही कोणाची संस्था आहे हा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणाच्या नावाखाली फसवणूक, कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा?
Follow us on

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरात फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या सुरु आहेत. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शिक्षणाचा नावाखाली फसवणूक झाली आहे. पुण्यात कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा उघड झाला आहे. नुकतेच आयटी कंपन्यांमधील तरुणांना कर्ज टॉपअप करणाऱ्याच्या नावाने फसवले गेले होते. त्या प्रकरणात तब्बल २०० तरुणांची फसवणूक झाली होती. आता ऑनलाईन एज्युकेशन घोटाळ्यातही शेकडो युवकांची फसवणूक झाली आहे.

काय आहे प्रकरण

पुण्यात कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा समोर आला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गिकलर्न, राईट प्लेस फॉर टेक्नॉलॉजी लर्निग या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

कशी झाली फसवणूक

एज्युकेशन लोनच्या नावाखाली राज्यभर शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. एज्युकेशन लोन करून देऊन त्यांचे हप्त्याच्या रकमेएवढी स्कॉलरशीप म्हणून देणार असल्याचे सांगून अनेक विद्यार्थ्यांना गिकलर्न, राईट प्लेस फॉर टेक्नॉलॉजी लर्निग कोर्समध्ये प्रवेश देण्यात आला. युवकांनी एज्युकेशन लोन स्वतःच्या नावावर घेतले. त्यांना जुजबी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम मिळाली नाही. शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांमध्ये अशी फसवणूक झाल्यामुळे हा एकूण घोटाळा कोट्यवधींमध्ये जाणार आहे.

किती घेतले कर्ज

पुण्यातील जवळपास १०० हून अधिक तरुणांच्या नावावर अशा प्रकारे दोन ते अडीच लाख रुपयांचे एज्युकेशन लोन घेण्यात आले. आता या शैक्षणिक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीन्यांनी तरुणांना तगादा लावला. ही संस्था नेमकी कुठे आहे कोण चालवत आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा

दांपत्याने पुण्यातील लोकांना तब्बल १६ कोटींत फसवले, वाचा कसे गंडवले शेकडो पुणेकरांना

पुणे शहरातील डॉक्टरासह नऊ जणांची कोट्यवधीत फसवणूक? काय केले नेमके आरोपीने?

पुणे येथील उच्चशिक्षित २०० तरुणांना ३०० कोटींचा गंडा, पोलीस आयुक्तालयासमोरच कार्यालय उघडून फसवणूक