AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण कधी सुरु होणार? चार तासांत होणार प्रवास शक्य

Pune News : पुणे ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे काही दिवसांत सहा तासांचा हा प्रवास चार तासांवर येणार आहे. सध्या दोन्ही बाजूने कामे वेगाने सुरु आहे. काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण कधी सुरु होणार? चार तासांत होणार प्रवास शक्य
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 16, 2023 | 12:40 PM
Share

रणजित जाधव, पुणे | 16 जुलै 2023 : पुणे रेल्वे स्थानकावरुन अनेक शहरांपर्यंत प्रवास करता येतो. आता लवकरच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा प्रवास जलद अन् वेगवान होणार आहे. या मार्गावर असणाऱ्या मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. मिरज, पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणानंतर सहा तासांचा प्रवास चार तासांवर येणार आहे. परंतु त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

काय आहे कामाची प्रगती

पुणे मिरज विभागातील 279.05 किलोमीटर पैकी आतापर्यंत 164.07 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नांद्रे ते सांगली स्थानकात दरम्यानचे 12.62 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. उर्वरित काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे एप्रिल २०२४ पासून हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

काय आहेत अडचणी

पुणे ते मिरज हे अंतर 280 किलोमीटर आहे. या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामास सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. परंतु सातारा जिल्ह्यात अनेक अवघड वाटा आहेत. हा भाग डोंगराळ आहे. यामुळे बोगदे अन् पुलांची उभारणी करावी लागत आहे. त्या कामांना विलंब होत आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या मार्गावर सांगलीतील कामाला चांगलाच वेग आला आहे.

नवीन इमारत उभारली

सांगली स्थानकात नवीन स्थानक इमारत बांधली गेली आहे. त्यानंतर या मार्गावर असलेल्या माधवनगर स्थानकावर नवी इमारत तयार केली गेली आहे. माधवनगरला प्लॅटफॉर्म देखील बांधले गेले आहे. नांद्रे रेल्वेस्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवली गेली आहे. पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करत कामे वेगाने सुरु आहे. पुणे मिरज मार्ग सुरु झाल्यानंतर या भागातील अनेक जणांना फायदा होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. यामुळे एप्रिल २०२४ पासून या मार्गावर सुसाट जात येणार आहे.

Follow Us
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन