Pune Sainath Babar : अखेर रिचेबल झाले पुण्याचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर; म्हणाले, राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणेच होणार आंदोलन

कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने काल पोलिसांनी काही मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाईमुळे मला समोर येता आले नसल्याचे साईनाथ बाबर यांनी स्पष्टीकरण दिले.

Pune Sainath Babar : अखेर रिचेबल झाले पुण्याचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर; म्हणाले, राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणेच होणार आंदोलन
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 12:44 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्याप्रमाणे पुढचा आंदोलनाचा टप्पा पार पडणार, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी दिली आहे. कालपासून नॉटरिचेबल असणारे पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आता रिचेबल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारनंतर मनसे पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने काल पोलिसांनी काही मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाईमुळे मला समोर येता आले नसल्याचे साईनाथ बाबर यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरात सह्यांची मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भोंग्यांच्या (Loudspeaker) संदर्भात शहरातील मौलवी आणि मुस्लीम बांधवांशी चर्चा करण्याचे नियोजन असल्याचे बाबर म्हणाले आहेत.

‘आंदोलन सुरूच राहणार’

काल मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर काही पदाधिकारी नॉट रिचेबल होते. पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते नॉट रिचेबल होते. आज साईनाथ बाबर यांच्याही संपर्क साधला असता त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर पुढील रणनीती स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत भोंग्यांवरून आपली भूमिका ठाम असल्याचेच सांगितले होते. केवळ मशिदींवरचेच नाही तर सर्वच प्रकारच्या प्रार्थनास्थळांवरचे भोंगे उतरवले जावे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे केवळ चार तारीखच नाही तर यापुढेही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साईनाथ बाबर म्हणाले.

मुस्लीम समाजबांधवांशी चर्चा

मनसेचे नेते वसंत मोरे पुण्याबाहेर असल्याने त्यांनी एक फेसबुक पोस्ट करून भोंग्यांविषयीची भूमिका स्पष्ट केली होती. प्रभागातील मुस्लीम बांधवांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सर्व मुस्लीम बांधवांचे त्यांनी आभारही मानले होते. तर साईनाथ बाबर यांनीही अशीच काहीशी भूमिका मांडली. भोंग्यांच्या मुद्द्यावर मशिदींमधील मौलवी तसेच मुस्लीम बांधवांशी चर्चा करणार असल्याचे बाबर म्हणाले. एकूणच, मुस्लीम मतदार दुरावू नये, असा मनसेचा प्रयत्न आहे.

काय म्हणाले साईनाथ बाबर?