आधी जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, आता अजित पवारांचा नंबर, पुणे मनपा उपमहापौर निवडणुकीत कुणाची बाजी?

| Updated on: Apr 01, 2021 | 12:03 PM

पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची (Pune Municipal Corporation) निवडणूक येत्या 6 एप्रिलला होत आहे. ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने (Pune deputy mayor election) होणार आहे.

आधी जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, आता अजित पवारांचा नंबर, पुणे मनपा उपमहापौर निवडणुकीत कुणाची बाजी?
पुणे महापालिका
Follow us on

पुणे : पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदाची (Pune Municipal Corporation) निवडणूक येत्या 6 एप्रिलला होत आहे. ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने (Pune deputy mayor election) होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha vikas Aaghadi) पुन्हा एकदा आमने सामने येणार आहे. भाजप आणि रिपाईंकडून सुनीता वाडेकर (Sunita Vadekar) रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या लता राजगुरु (Lata Rajguru) यांनी अर्ज दाखल केला आहे. (Pune Municipal Corporation deputy mayor election BJP RPI Sunita Vadekar vs Lata Rajguru)

पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र आधी सांगली आणि मग जळगावात बसलेल्या धक्क्यानंतर, भाजप आता सावध पावलं टाकत आहे. सांगलीत जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत, महापौर निवडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला. तर जळगावात शिवसेनेने सर्जिकल स्ट्राईक करत भाजपला धोबीपछाड दिली. त्यामुळे आता पुणे महापालिकेत अजित पवार काही जादू करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीने कंबर कसली

दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं चांगलीच कंबर कसली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने होत आहे. भाजपा आणि रिपाई या दोन्ही पक्षांनी मिळून उपमहापौरपद हे अडीच अडीच वर्षांसाठी ठरवलं होतं, मात्र भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर रिपाईंला खूश करण्याचा प्रयत्न केलाय आता 6 तारखेच्या निवडणुकीत काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल

भाजप 99
काँग्रेस 09
राष्ट्रवादी 44
मनसे 2
सेना 9
एमआयएम 1

एकूण 164

सांगलीत करेक्ट कार्यक्रम

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना जोरदार धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं.

जळगावात भाजपला धक्का

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली.

जळगाव महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ

एकूण नगरसेवक: 80

भाजप : 57
शिवसेना : 15
एमआयएम : 3
स्विकृत नगरसेवक : 5 (मतदानाचा हक्क नाही)

संबंधित बातम्या  

जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथवली, महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

सांगली महापौर निवडणूक : व्हीप डावलून राष्ट्रवादीला मतदान, भाजप सात नगरसेवकांवर कारवाई करणार