पोटच्या मुलीचा पुण्यात अचानक मृत्यू, मन घट्ट करुन केले अवयवांचे दान, तब्बल 6 जणांना जीवदान

| Updated on: Sep 15, 2021 | 11:38 PM

दाम्पत्याची 17 वर्षाची मुलगी आज हयात नसली तरी तिच्या अवयवांमुळे आज तब्बल सहा जणांना जीवदान मिळाले आहे. श्रुती बाबुराव नरे असे मृत 17 वर्षीय तरुणीचे नाव असून ती आज हयात नसली तरी सहा जणांच्या रुपात आजही ती आपल्या आई-वडिलांसोबत आहे.

पोटच्या मुलीचा पुण्यात अचानक मृत्यू, मन घट्ट करुन केले अवयवांचे दान, तब्बल 6 जणांना जीवदान
ORGAN DONATION
Follow us on

पुणे : पिंपरी चिंचवड येथील दाम्पत्याने सर्वांना आदर्शवादी ठरावं अस काम केलं आहे. पोटच्या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर या आई-वडिलाने मुलीचे अवयव दान केले आहेत. या दाम्पत्याची 17 वर्षाची मुलगी आज हयात नसली तरी तिच्या अवयवांमुळे आज तब्बल सहा जणांना जीवदान मिळाले आहे. श्रुती बाबुराव नरे असे मृत 17 वर्षीय मुलीचे नाव असून ती आज हयात नसली तरी सहा जणांच्या रुपात आजही ती आपल्या आई-वडिलांसोबत आहे. (pune pimpri chinchwad couple donates organs of the 17 year old daughter)

मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् मृत्यू झाला

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील श्रुती नरे या 17 वर्षीय मुलीचा अचानकपणे मृत्यू झाला. चक्कर येत असल्यामुळे या मुलीचे सुरुवातीला डोके दुखायला लागले. तसेच नंतर ही मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडली. ही घटना घडल्यानंतर मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, कोमात गेल्यामुळे तसेच मेंदूत रक्तश्राव झाल्यामुळे या मुलीचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मन घट्ट करत मुलीच्या अवयवांचे दान 

आपल्या मुलीसोबत असा प्रकार घडल्यामुळे समजताच श्रुतीच्या आईवडिलांना काय करावे हे समजत नव्हते. हा आघात सहन करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. मात्र, आपली मुलगी आज आपल्यासोबत नसली तरी तिच्या अवयांच्या मदतीने काही लोकांचा जीव वाचू शकतो, या गोष्टीची दाम्पत्याला जाणीव झाली. तसेच या दाम्पत्याने मन घट्ट करत आपल्या मुलीच्या अवयवदानाला परवानगी दिली.

अवयव दान करण्याचे डॉक्टरांचे आवाहन

श्रुतीच्या आई-वडिलांनी तिच्या अवयवांचे दान केल्यामुळे आज तब्बल सहा जणांचे प्राण वाचू शकले आहेत. असा प्रसंग कोणासोबतही येऊ नये. मात्र, हा दुर्दैवी प्रसंग घडलाच तर अवयवांचे दान करुन कोणाचातरी प्राण वाचू शकतो याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. सध्याच्या कोरोना महामारीमुळे अनेक लोकाचे अवयव निकामी होत आहेत. किडनी, हृदय तसेच मुत्रपिंड निकामी होण्याची तर अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे या लोकांना वेळीच दुसरा अवयव भेटला तर त्यांचा जीव वाचू शकतो, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. श्रुती आज हयात नाही. पण तिच्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे आजही ती जिवंत आहे.

इतर बातम्या :

साकीनाका बलात्कार प्रकरण, पीडितेच्या कुटुंबियांची सरकारी वकील बदलण्याची मागणी, कोण हवं तेही सांगितलं, भीम आर्मीही आक्रमक

राज्यात रक्ताचा तुटवडा, नवी मुंबईत आरोग्य उत्सव, महा रक्तदान शिबिरात 255 रक्तबाटल्या संकलन

क्विनोआ म्हणजे काय? जागतिक स्तरावरही त्याची ख्याती, जाणून घेऊ क्विनोआबद्दल

(pune pimpri chinchwad couple donates organs of the 17 year old daughter)