राज्यात रक्ताचा तुटवडा, नवी मुंबईत आरोग्य उत्सव, महा रक्तदान शिबिरात 255 रक्तबाटल्या संकलन

वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. ही बाब लक्षात घेता पाच वर्षांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक आणि माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या माध्यमातून महा रक्तदानाची मोहीम सुरू झाली. दरवर्षी हजारो नागरिक या मोहिमेत रक्तदान करतात.

राज्यात रक्ताचा तुटवडा, नवी मुंबईत आरोग्य उत्सव, महा रक्तदान शिबिरात 255 रक्तबाटल्या संकलन
राज्यात रक्ताचा तुटवडा, नवी मुंबईत आरोग्य उत्सव

नवी मुंबई : राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी मुंबईमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. (Blood donation camp on the occasion of Prime Minister Modi and Ganesh Naik’s birthday)

गणेश नाईक ब्लड डोनर चैन अंतर्गत नवी मुंबईमध्ये रक्तदानाच्या विधायक उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस आणि आमदार गणेश नाईक यांचा आज 15 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस या दोन्ही वाढदिवसाच्या निमित्ताने हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी अभिनव उपक्रम

माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती अनंत सुतार, माजी नगरसेवक सुरज पाटील, भाजपाचे नवी मुंबई महासचिव सतीश निकम, भाजपाचे महामंत्री विजय घाटे, भाजपाचे लोकप्रतिनिधी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महा रक्तदानाचा शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध प्रभागांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.

रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता हा अभिनव उपक्रम सुरू राहणार आहे. कोरोनाच्या काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता महा रक्तदानाचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या विधायक शुभेच्छा दिल्या आहेत.

महारक्तदान मोहिमेअंतर्गत पुढील शिबिर 17 सप्टेंबर रोजी होणार

वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. ही बाब लक्षात घेता पाच वर्षांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक आणि माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या माध्यमातून महा रक्तदानाची मोहीम सुरू झाली. दरवर्षी हजारो नागरिक या मोहिमेत रक्तदान करतात. या मोहिमेअंतर्गत संकलित केलेले रक्त नवी मुंबईतील महापालिका तसेच विविध रक्त पेढ्यांना दिले जाणार आहे. वर्षातले 365 दिवस विविध ठिकाणी रक्तदान शिबिर भरवली जाणार आहेत. जी व्यक्ती रक्तदान करणार आहे त्याला गरजेच्यावेळी रक्त उपलब्ध होणार आहे. रक्तदान करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित करा अशी ही संकल्पना आहे. (Blood donation camp on the occasion of Prime Minister Modi and Ganesh Naik’s birthday)

इतर बातम्या

नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये होणार अमुलाग्र बदल, पेरणीपासून बाजारपेठ पर्यंत माहिती होणार उपलब्ध

iPhone 13 च्या लाँचिंगनंतर गुगलवर लोक सर्च करतायत कोणत्या अवयवाशिवाय माणूस जिवंत राहील?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI