क्विनोआ म्हणजे काय? जागतिक स्तरावरही त्याची ख्याती, जाणून घेऊ क्विनोआबद्दल

पौष्टिक धान्यांपैकी एक किनोवा आहे. याची फार कमी लोकांना माहीत असेल की 2013 हे वर्ष संयुक्त राष्ट्राच्या कृषी आणि अन्न संघटनेने आंतरराष्ट्रीय क्विनोआ वर्ष म्हणून घोषित केले. याचा उद्देशच हा होता की, प्रत्येक व्यक्तीला या पिकाचे महत्त्व कळू शकेल.

क्विनोआ म्हणजे काय? जागतिक स्तरावरही त्याची ख्याती, जाणून घेऊ क्विनोआबद्दल
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या या वाढतच आहेत. त्याच वेळी नागरिकांना आठवण होते ती पौष्टिक धान्यांची. अशाच पौष्टिक धान्यांपैकी एक किनोवा आहे. याची फार कमी लोकांना माहीत असेल की 2013 हे वर्ष संयुक्त राष्ट्राच्या कृषी आणि अन्न संघटनेने आंतरराष्ट्रीय क्विनोआ वर्ष म्हणून घोषित केले. याचा उद्देशच हा होता की, प्रत्येक व्यक्तीला या पिकाचे महत्त्व कळू शकेल. याला मदर ग्रेन असेही म्हणतात. त्यामध्ये अंडी आणि गाईच्या दुधापेक्षा जास्त लोह असते.

पीक संशोधन नेटवर्कशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मते, क्विनोआ हे एक वर्षाचे रब्बी पीक आहे आणि ते शरद ऋतुमध्ये घेतले जाते. त्याची बियाणे पांढरे, गुलाबी आणि हलके तपकिरी रंगाचे असतात.  क्विनोआ, राजगिरा प्रमाणे, क्विनोआला धान्याच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून याचा वापर अन्नधान्य आणि हिरव्या पालेभाज्या म्हणून केला जात आहे. what-is-quinoa-his-reputation-globally-lets-learn-about-quinoa

हे आहेत वैशिष्ट

कृषी शास्त्रज्ञांच्या मते, क्विनोआ खाल्याने नागरिकाला निरोगी आयुष्य मिळते. त्यामुळेच ते एक पवित्र धान्य मानले गेले. अन्न आणि पोषण सुरक्षा लक्षात घेऊन प्राचीन पिकांकडे जागतिक स्तरावर पर्यायी अन्न पिके म्हणून पाहिले जात आहे. क्विनोआ कमी पाणी, हलक्या प्रतीच्या जमीनीत आणि प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पादन देते. यामुळे अन्न आणि पौष्टिक गरजा पूर्ण करते. हे पीक लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते.

कसे आहे क्विनोआचे उत्पादन

अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, जगातील क्विनोआचे क्षेत्र हे 1,72,239 हेक्टर होते. उत्पादन 97,410 टन होते, जे 2015 मध्ये 1,97,637 हेक्टरपर्यंत वाढले. तर उत्पादन 1,93,822 टनांवर गेले. क्विनोआ इतर धान्यांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. संपूर्ण प्रथिने समृद्ध असल्याने, त्याला भविष्यातील सुपर ग्रेन म्हटले जात आहे. लागवडीला विशेष हवामानाची गरज नसते. भारताचे हवामान त्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे.

Kinova मध्ये काय आहे?

क्विनोआ मधील प्रथिने तांदळाच्या दुप्पट, फायबर मक्यापेक्षा दुप्पट आणि चरबी गव्हाच्या तिप्पट आहे. क्विनोआच्या बियांमध्ये तुरट पदार्थ नावाचा पोषक घटक आढळतो. त्याचे प्रमाण 0.2 ते 0.4 टक्के असते. क्विनोआ खाण्यापूर्वी किंवा त्याचे उत्पादन बनवण्यापूर्वी, बीपासून पृष्ठभाग काढून टाकणे आवश्यक गरजेचे आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI