Pune : सुट्टीसाठी काहीही! ‘मासे आणायला जायचंय, किरकोळ रजा मंजूर करावी’; पुण्यातल्या पोलीस हवालदाराचा सुट्टीचा अर्ज व्हायरल

| Updated on: Jun 02, 2022 | 3:23 PM

समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. दुसरीकडे या पत्राबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्याकडे असे पत्र अद्याप आलेले नाही, असे सांगण्यात आले आहे. व्हायरल मात्र सर्वत्र होत आहे.

Pune : सुट्टीसाठी काहीही! मासे आणायला जायचंय, किरकोळ रजा मंजूर करावी; पुण्यातल्या पोलीस हवालदाराचा सुट्टीचा अर्ज व्हायरल
खडक पोलीस ठाणे आणि चिलापी, रव मासा
Follow us on

पुणे : सुट्टी मिळण्यासाठी काय पण! असा विचार तुम्ही ही बातमी वाचल्यानंतर नक्कीच म्हणाल. पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police) सुट्टी मिळावी म्हणून हटके स्टाईलमध्ये वरिष्ठांना पत्र लिहिले आहे. आपल्या सहकाऱ्याला चिलापी आणि रव मासे घेऊन यायचे कारण देत एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र (Leave application) लिहिले आहे. मासे आणायचे कारण देत दोन दिवस सुट्ट्या द्या, असा पत्रात मजकूर नमूद करण्यात आला आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कर्मचारी कार्यरत आहे. दरम्यान, या हटके पत्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. दुसरीकडे या पत्राबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्याकडे असे पत्र अद्याप आलेले नाही, असे सांगण्यात आले आहे. व्हायरल मात्र सर्वत्र होत आहे.

हटके स्टाइल

सुट्टी मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या युक्त्या शोधत असतात. वरिष्ठांना कसेबसे तयार करत असतात. यात कधी यश येते कधी येत नाही. सुट्टीसाठी आपल्याला मेल करावा लागतो आणि परवानगी घ्यावी लागते. कधी खरे सांगून नाही तर खोटे सांगून का होईना सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. पुण्यातील एका पोलीस हवालदाराने अशीच एक युक्ती शोधली आहे आणि हटके कारण सांगून सुट्टी मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठांना सुट्टीविषयी लिहिलेले पत्र

व्हायरल होत असलेले हेच ते पत्र

‘मासे आणायला जायचे आहे’

पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात असलेले पोलीस हवालदार एस. डी. शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुट्टीचा अर्ज केला आहे. त्यात म्हटले आहे, की उपरोक्त विषयान्वये सविनय सादर, की माझी साप्ताहिक सुट्टी दिनांक 29/05/2022 रोजी असून माझे मूळ गावी मु. पो. वाशींबे जि. सोलापूर येथून खडक पो. स्टे.चे माझे सहकारी यांचेसाठी चिलापी व रव मासे घेवून येणे असल्याने मला दिनांक 29/05/2022 रोजीची साप्ताहिक सुट्टी जोडून दिनांक 30/05/2022 रोजीची एक दिवस किरकोळ रजा मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मिळण्यास विनंती आहे. असा अर्ज त्यांनी वरिष्ठांकडे केला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.