पुण्यात मुसळधार! येत्या 48 तासात पुन्हा धो धो बरसणार? परतीच्या पावसाबाबतही महत्त्वाची अपडेट

| Updated on: Oct 15, 2022 | 7:30 AM

पुण्यात 2 तासात तब्बल 78 मिलीमीटर पावसाची नोंद! आज आणि उद्यासाठी हवामान विभागाने का अंदाज वर्तवला?

पुण्यात मुसळधार! येत्या 48 तासात पुन्हा धो धो बरसणार? परतीच्या पावसाबाबतही महत्त्वाची अपडेट
पावसाची खबरबात
Follow us on

अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : पुण्यात शुक्रवारी अवघ्या दोन तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची (Pune Rains) नोंद झाली. या पावसाने पुणे शहर (Pune News) जलमय झालं. दोन तासांत तब्बल 78 मिलीमीटर इतका पाऊस पुण्यात झाला. दरम्यान, आता येत्या 48 तासांतही मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर पुणे शहरासह जिल्ह्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज उद्यासाठी येलो अलर्ट

आज आणि उद्या पुण्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील सगळेच मुख्य रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

पाहा व्हिडीओ :

गेला आठवडाभर पुण्यात पावसाने हजेरी लावली होती. अधूनमधून विजांच्या गडगडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पुण्यात झाला होता. या पावसाची पुण्यातही हजेरी आणखी काही दिवस लांबली आहे.

परतीचा प्रवास कधी?

एकीकडे ऑक्टोबर महिना अर्धा उलटला तरीही राज्यात मान्सूनचा पाऊस बरसतोच आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढवली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा परतीच्या पावसाचा प्रवास लांबलाय. अशातच आता पावसाचा परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार, याबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

पुढील तीन दिवसांत पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परतेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात 20 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे.

प. महाराष्ट्रात 3 दिवस पावसाचे

प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा तसंच कोकणातील काही भागात पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने याबाबतची अंदाज वर्तवलायी