ज्या ठिकाणी राहायचा, तिथेच चोरी करायचा; पुण्यात अट्टल चोराला अटक

पुण्यात एका अट्टल चोराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो ज्या परिसरात राहायचा, तिथेच रेकी करून चोरी करायचा. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि 49 बनावट चाव्या जप्त झाल्या आहेत. पोलिसांनी त्याच्यावर आधीचे गुन्हेही उघडकीस आणले आहेत.

ज्या ठिकाणी राहायचा, तिथेच चोरी करायचा; पुण्यात अट्टल चोराला अटक
प्रातनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 13, 2025 | 10:18 PM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आज पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने पुण्यातील विविध भागात 50 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. विशेष म्हणजे हा तरुण ज्या ठिकाणी राहायचा, त्या ठिकाणी तो रेकी करायचा आणि त्यानंतर त्याच भागात वेशभूषा करुन चोरी करायचा अशी माहिती समोर आली आहे. हर्षद पवार असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्राम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्यातच आज पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. या चोरट्याने पुणे शहरातील विविध भागात तब्बल 50 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. या चोरट्याकडे 49 बनावट चाव्याही आढळल्या आहेत.

हर्षद गुलाब पवार अस या चोरट्याचं नाव आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी त्याचे अलीकडच्या काळात केलेले 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्यावर त्याआधीचे 51 गुन्हे दाखल आहेत. तो ज्या ठिकाणी राहायचा, त्याच ठिकाणी तो रेकी करायचा आणि नंतर त्याच भागात चोरी करायचा. विशेष म्हणजे चोरी करताना तो वेशभूषा करुन चोरी करायचा. महत्त्वाचे म्हणेज ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे त्या ठिकाणी तो चोरी करत नव्हता. मात्र ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, त्या ठिकाणी तो जाऊन चोरी करायचा.

त्याच्याकडून चोरी करण्यात आलेला 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यात 49 बनावट चाव्यांचा समावेश आहे. त्याला याआधी देखील तीन ते चार वेळा अटक करण्यात आली आहे. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा घरफोड्या करायच्या. त्याने अजून किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us