
शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी सामूहिक नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आला. यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलं असून या विरोधात काल काही संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.दरम्यान याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.
आज राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात जाऊन त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं. शनिवारवाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी सामूहिक नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.त्यानंतर काही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात निदर्शने केली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
शनिवारवाडा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू
शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे.पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री तक्रार केली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.
‘मराठा सम्राज्याचा विस्तार ज्या ठिकाणहून झाला’
“शनिवारवाडा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या हिंदवी स्वराज्याचा, मराठा सम्राज्याचा विस्तार ज्या ठिकाणहून झाला. त्याचं केंद्र स्थान असलेला शनिवारवाडा आमच्यासाठी ऐतिहासिक भूषण आहे. अशा ठिकाणी मुस्लिमांच्या काही गटांनी काही मुस्लिम महिलांनी प्रामुख्याने या ठिकाणी शुक्रवारी नमाज पठण केल्याच लक्षात आलय” असं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
‘ठिकठिकाणी अशा प्रकारे जमिनी काबीज करणं सुरु’
एका हिरव्या भिंतीला तुम्हा भगवा कलर दिला होता.पुण्यात अशा घटना घडत आहेत या प्रश्नावर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “सगळीकडे अशा घटना घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत ते माहित आहे. ठिकठिकाणी अशा प्रकारे जमिनी काबीज करणं सुरु आहे”
तुमची भूमिका काय असणार आहे?
“आमची भूमिका ही आहे की कुठल्याही प्रकारे असं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. नमाज पढतात आणि नंतर ती जागा वक्फची म्हणून घोषित करतात. देशद्रोही कारभार चालतो. आमचा अशा कुठल्याही गोष्टीला विरोध आहे. असं कुठलही कारस्थान खपवून घेणार नाही. यासाठी हिंदू समाज जागृत झालेला आहे. आम्ही ती जागा पवित्र केली” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
‘सकल हिंदू समाज जागृत झाला’
“इथून पुढच्या काळात अनधिकृत मजार इथे दिसणार नाही, याची जबाबदारी एएसआय, पोलिसांनी घेतली पाहिजे. कुठल्याही गडावर बघा, तिथे कब्जा मारतात, नमाज पढतात. सारसबागेत नमाज पढतात, पर्वतीच्या इथे नमाज पढणार आणि ती जागा आमची आहे सांगणार. इथून पुढे हे चालणार नाही, सकल हिंदू समाज जागृत झाला आहे” असं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.