Pune ZP Recruitment Scam | पुणे जिल्हा परिषद बोगस भरतीतील तब्बल 626 कर्मचाऱ्यांना दिला नारळ…., काय आहे घोटाळा?

ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकरी भरती झाल्याचे समोर आले होते. तक्रारीनंतर जिल्हा परिषदेनेही चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर महापालीकेनेंही या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले होते. त्यानुसार कारवाई करत जिल्हापरिषदेने थोडे थोडक्या नव्हे तर तब्बला 626 कर्मचार्‍यांना अखेर घराचा रस्ता दाखवला आहे.

Pune ZP Recruitment Scam | पुणे जिल्हा परिषद बोगस भरतीतील तब्बल 626  कर्मचाऱ्यांना दिला नारळ...., काय आहे घोटाळा?
pune zp
| Updated on: Feb 05, 2022 | 10:16 AM

पुणे – पुणे महानगरपालिकेत नव्याने 23 गावांमध्ये मोठ्याप्रमाणात बोगस भरती झाल्याचे समोर आले होते. या बोगस भारतीच्या विरोधात अनेक तक्रारी जिल्हा परिषदेकडे(Pune Zilla Parishad) आल्या होत्या. नगरसेवकांनी (corporators)या भरतीबाबत  सभागृहात गोंधळ यावर आवाज उठवाला होता. तक्रारीनुसार या गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्याच्या निर्णय सरकारने घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेक ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकरी भरती(Bogus Recruitment Scam) झाल्याचे समोर आले होते. तक्रारीनंतर जिल्हा परिषदेनेही चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर महापालीकेनेंही या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले होते. त्यानुसार कारवाई करत जिल्हापरिषदेने थोडे थोडक्या नव्हे तर तब्बला 626 कर्मचार्‍यांना अखेर घराचा रस्ता दाखवला आहे.

नेमका घोटाळा कसा झाला

पुणे जिल्ह्यातील 23 गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. त्यानुसार 30 जुन 2021 रोजी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. मात्र गावांचा महानगरपालिकेत समावेश होणार असल्यानं अनेकांनी गावांमधील ग्रामसेवकांच्या मदतीने बोगस पद्धतीनं आपलं काम करत ठीक ठिकाणी आपली कर्मचारी म्हणून नियुक्ती करून घेतली.महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर या गावांमधील ग्रामपंचायतीसह तेथील कर्मचारी वर्ग पालिकेच्या आस्थापनेत आला होता. मात्र अनेक गावांतून जिल्हा परिषदेकडे तक्रारी आल्यानंतर आहे घोटाळा उघड झाला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने या प्रकरणी 14 ग्रामसेवक व 2 कृषी विस्तार अधिकार्‍यांवर ठपका ठेवला होता. तसेच यासंबधीचा अहवाल पालिकेला पाठविला होता. त्यानुसार पालिका आयुक्तांनी समाविष्ट गावांमधील ग्रामपंचायतीकडून आलेल्या 626 कर्मचार्‍या कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

रेकॉर्ड नुसार कर्मचारी

गावे आल्यानंतर रेकॉर्ड नुसार कर्मचारी – 1007 जिल्हा परिषदेने चौकशी केलेले कर्मचारी – 1045, गावांमधील आकृतीबंधानुसार कर्मचारी – 362, जिल्हा परिषदेने निर्णय घेतलेले कर्मचारी – 11,  चौकशी अहवालातील नियमवाह्य कर्मचारी – 626, चौकशीतील नियमबाह्य मात्र, यादीत नाव नसलेले – 46,

या गावातील बोगस कर्मचारीसंख्या

1) सुस – 40,

2) बावधन बुद्रुक – 55
3) किरकटवाडी – 64
4) कोंढवे- धावडे – 64
5) न्यु कोपरे – 40
6) नांदेड – 37
7) खडकवासला – 66
8) नर्‍हे – 85
9) होळकरवाडी – 37
10) औताडे -हांडेवाडी – 28
11) वडाची वाडी – 14
12) नांदोशी- सणसनगर – 19
13) मांगडेवाडी – 36
14) भिलारेवाडी – 15
15) गुजर निंबाळकरवाडी – 34
16) जांभूळवाडी – कोळेवाडी – 45
17) वाघोली – 06

NEET PG Exam : नीट परीक्षा लांबणीवर, 6 आठवड्यानंतर परीक्षेचं आयोजन

वाइनचा वाद औरंगाबादेत अवतरला, दारुबंदीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली, जि.प. बैठकीत घमासान!

Vasant Panchami 2022 | देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी अर्पण करा, मनोकामना पूर्ण होतील!