इंजिनिअर अन् इतर उच्च शिक्षितांची ऑनलाईनची शक्कल ठरली फोल, ॲपने अंमलपदार्थांची विक्री पडली महागात

| Updated on: May 27, 2023 | 10:43 AM

Pune Crime news : पुणे शहरातून ऑनलाइन विक्री प्रकाराचा मोठा भांडाफोड झाला आहे. ऑनलाइन ॲपचा वापर करुन उच्च शिक्षित तरुण अंमली पदार्थांची विक्री करत होते. या प्रकरणी पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केलीय.

इंजिनिअर अन् इतर उच्च शिक्षितांची ऑनलाईनची शक्कल ठरली फोल, ॲपने अंमलपदार्थांची विक्री पडली महागात
कल्याण स्थानकात तरुणीची छेडछाड
Follow us on

पुणे : उच्च शिक्षण झाल्यानंतर कोणीही चांगली नोकरी करुन सुखाने जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु एमबीए अन् इंजिनिअरची पदवी घेतल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणारे महाभागही आहेत. कमी वेळेत अधिक पैसे कमवण्याचा उद्योग काही जणांना चांगलाच महागात पडला. पुणे पोलिसांनी एका अशाच टोळीचा मुसक्या आवळल्या आहेत. ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर करुन हे उच्चशिक्षित तरुण अंमली पदार्थांची विक्री करत होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकार

डंझो ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे गुन्हेगारी व्यवसाय काही जणांनी सुरु केला. पुणे शहरातील कोथरुड आणि परिसरात त्यांनी थाटला. ते एलएसडी या अंमली पदार्थांची खरेदी विक्री अ‍ॅपद्वारे करत होते. तसेच अंमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाईन डिलिव्हरी करत होते. पुणे पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचला.

हे सुद्धा वाचा

असे आले जाळ्यात

पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर ऑनलाईन अंमल पदार्थांची विक्री करणाऱ्या रोहन गवई याला प्रथम पकडले. त्याच्याकडे 90 हजार रुपयांचे एलएसडी मिळाले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इतर साथीदारांची नावे पोपटासारखी सांगितली. मग पोलिसांनी रोहन गवई (वय २४), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय २६), धीरज दीपक ललवाणी (वय २४), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय २५) आणि ओंकार रमेश पाटील (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत तब्बल ५१ लाख ६० हजार रुपयांचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे.

 

गवई एमबीए तर गायकवाड इंजिनियर

गवई हा पुण्यात MBA चं शिक्षण घेत आहे. गायकवाड हा इंजिनियर आहे आणि बाकी दोघांनीही चांगलं शिक्षण घेतलं आहे.

कशी करत होते विक्री?

अटक केलेले तरुणांनी पॉर्टी आणि बाकी शौक पुरवण्यासाठी हा धंदा सुरु केला. धीरज, दीपक आणि ओंकार या टोळीचा लीडर होता. व्हॉटसअ‍ॅपने संपर्क साधल्यानंतर ते डिलिव्हरी करत होते. त्यासाठी फूड अ‍ॅपने ऑर्डर बुक करत होते. यामुळे एखादी ऑर्डर आल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करुन देत होते. या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचं.

हे ही वाचा

Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार