Sanjay Raut : संजय राऊतांची तोफ आज पुण्यात धडाडणार, टार्गेट राज ठाकरे आणि भाजप, नेमकं बोलणार काय?

| Updated on: May 05, 2022 | 7:00 AM

या सभेत अर्थातच राऊतांचं टार्गेट ठरलेलं असेल, ते म्हणजे राज ठाकरे आणि भाजप, आजच राज ठाकरेंना राऊतांनी नवहिंदू ओवैसी असा पुन्हा उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्या आता राऊत काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sanjay Raut : संजय राऊतांची तोफ आज पुण्यात धडाडणार, टार्गेट राज ठाकरे आणि भाजप, नेमकं बोलणार काय?
मनसेच्या खांद्यावरुन भाजपनं हिंदुत्वाचा गळा घोटला, राऊतांचा आरोप
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : राज्यात सध्या अनेक मुद्द्यावरून राजकारणाचा पारा चढला आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घेतलेली आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा रान पेटलं आहे. महाविकास आघाडी या निर्णयानंतर राज ठाकरेंवर जोरदार टीका करत आहे. तर भाजप राज ठाकरेंचं भरभरून समर्थन करत आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीच्या (MNS BJP Alliance) चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अशातच आता शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. कारण आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यात जाहीर सभा आहे. या सभेत अर्थातच राऊतांचं टार्गेट ठरलेलं असेल, ते म्हणजे राज ठाकरे आणि भाजप, आजच राज ठाकरेंना राऊतांनी नवहिंदू ओवैसी असा पुन्हा उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्या आता राऊत काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उद्या राऊत काय बोलणार?

राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ती फक्त हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंग्यांची, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप वारंवार शिवसेनेला डिवचत आहे. सत्तासाठी लाचारी पत्करत शिवसेनेने हिंदूत्व सोडलं असल्याची टीका भाजपकडून सतत होत आहे. या टीकेला उत्तर द्यायला शिवसेनेच्या  भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण असणारे संजय राऊत नेहमीच पुढे येत राहिलेत. त्याच्या रोजच्या पत्रकार परिषदेतही भाजप नेहमीच टार्गेटवर राहिले आहे. आणि अलिकडे भाजच्या सुरात सूर मिसळून राज ठाकरेही शिवसेनेच्या आणि संजय राऊतांच्या टिकेचे पुन्हा टार्गेट ठरत आहेत. राज ठाकरेंची औरंगाबादेतली सभा झाल्यापासून राज्यात जो राडा सुरू आहे. संजय राऊत त्यावरही भाष्य करण्याची शक्यता आहे.

महापालिकेसाठी शिवसेने कंबर कसली

येत्या काही दिवसातच मुंबई-पुण्यासह इतर बड्या महापालिकांच्या निवडणुका लागणाची शक्यता आहे. त्यामुळे या महापालिका काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आत्तापासूनच मैदानात उतरले आहे. त्यासाठी मुंबईत भाजप शिवेसनेला सत्तेतून खाली खेचण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. तर पुण्यात भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शिवसेना जोर लावत आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही ही सभा महत्वाची ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत हे पुण्याचे दौरे सतत करत आहेत. कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे राऊतांची ही सभा हायव्होल्टेज ठरण्याची दाट शक्यता आहे. आता राऊत या सभेतून राज ठाकरे आणि भाजपवर कसा पलटवार करणार हे ही सभा झाल्यावरच कळेल.