AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : वेडी आहेस का? स्वत:ला जरा…प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर संतापलेले नाना पाटेकर, सांगितला किस्सा

Actress On Nana Patekar : मराठी अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबद्दल भाष्य केलं असून एक किस्सा सांगितला आहे.

Nana Patekar : वेडी आहेस का? स्वत:ला जरा...प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर संतापलेले नाना पाटेकर, सांगितला किस्सा
| Updated on: Nov 13, 2026 | 7:19 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे. अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचाही समावेश आहे. नाना पाटेकर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकजण त्यांच्याशी बोलताना जरा सावध असायचे. वर्षा उसगांवकर यांनाही सुरुवातीच्या काळात नानांची प्रचंड भीती वाटायची. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नानांसोबतच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत.

वर्षा उसगांवकर यांनी सांगितला किस्सा

वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, ‘अलीकडेच नानांच्या शोकसभेत मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. एकतर त्यांचा स्वभाव फार फटकळ होता आणि त्या फटकळपणाचा मला चांगलाच प्रसाद मिळाला होता. एकदा सेटवर एक पत्रकार आले होते, आता मला त्या मॅगझिनचं नाव फारसं आठवत नाहीये. मी त्यांना सांगितलं, ‘हो मी जरुर मुलाखत देईन’ त्यावेळी नाना म्हणाले, ‘काय वेडी आहेस का? असा पटकन का होकार दिलास? स्वत:ला जरा महाग कर गं…’ मी त्यांना त्यावेळी काहीच बोलले नाही. कारण, सुरुवातीपासून मला नानांची फार भीती वाटायची. काही बोलले तर मला रागावतील असं मला नेहमीच वाटायचं. पण, याच बरोबरीने मला प्रश्न पडला स्वत:ला महाग कसं करायचं? नेमकं काय करायचं हे मला तेव्हा समजलं नव्हतं.’

‘त्यावेळी मी पुण्याला विमानानं जायचे. कारण, तेव्हा हा महामार्ग वगैरे नव्हता. महिन्याला चार-पाच वेळा माझं पुण्याला जाणं-येणं व्हायचं आणि प्रत्येकवेळी मला नाना भेटायचे आणि मला मागून येऊन घाबरवायचे. तेव्हा मल्हार 7-8 वर्षांचा होता. तो सुद्धा बोलायचा, ‘काय गं अशी काय घाबरतेस बाबांना…’ तर, एकंदर मला त्यांची फार भीती वाटायची. एकदा मला म्हणाले, ‘आता अभिनय वगैरे पुरे झाला…लग्न करून टाक!’ माझं असं झालं, आता काय मला हे रिटायर्ड व्हायला सांगत आहेत…मग माझ्या करिअरचं काय? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.’ असंही वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर बोलत होत्या.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप