Ravindra Dhangekar: राज्यात भयंकर दुष्काळ आणि महापालिकेच्या पैशातून खासदारांची मॅरेथॉन? रविंद्र धंगेकरांचे टीकास्त्र

पुणेकरांच्या कष्टाच्या घामातून पै-जमा केलेल्य टॅक्सरुपी पैशाचा अशा प्रकारे अपव्यय करण्याचा अधिकार पुणे महापालिका आयुक्तांना कोणी दिला...?"  असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

Ravindra Dhangekar: राज्यात भयंकर दुष्काळ आणि महापालिकेच्या पैशातून खासदारांची मॅरेथॉन? रविंद्र धंगेकरांचे टीकास्त्र
| Updated on: Nov 15, 2026 | 7:13 PM

प्रदीप कापसे, प्रतिनिधी:  Pune Run For Unity Marathon:  पुण्यात आज खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने ‘पुणे रन फॉर युनिटी’ ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती. आता या मॅरेथॉनवरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत रविंद्र धंगेकर?

Loading...

“अवघे राज्य प्रचंड दुष्काळात होरपळत असताना राज्य शासन प्रत्येक ठिकाणी निधीचा काटकसरीने व काळजीपूर्वक वापर करत आहे, असे असताना पुणे महानगरपालिकेने मात्र संस्कृती प्रतिष्ठानच्या मॅरेथॉनसाठी तब्बल ५० लाख रुपये देणगी तातडीने आर.टी.जी.एस करून दिली आहे. पुणेकरांच्या कष्टाच्या घामातून पै-जमा केलेल्य टॅक्सरुपी पैशाचा अशा प्रकारे अपव्यय करण्याचा अधिकार पुणे महापालिका आयुक्तांना कोणी दिला…?”  असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच “धावपटूंना धावण्यासाठी पुणे शहराच्या रस्त्यांवर ५-१० लाख रुपये खर्चात मॅरेथॉन होते, मात्र ५० लाख रुपये देणगी घेऊन आपल्या नेत्यांची चमकोगिरी करण्यासाठी हा सगळा पैसा उधळला गेला. जर दानत असेल तर स्वतःच्या पैशातून अशा प्रकारच्या गोष्टी करण्यास आमची काही हरकत नाही, परंतु इतक्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणेकरांचे पैसे वापरून राजकीय नेत्यांची चमकोगिरी करणे ही कुठली नीतिमत्ता..?” असा टोलाही धंगेकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, “नगरसेवकांचे मानधन दुष्काळी परिस्थितीमुळे कापले, राज्य शासन कर्मचाऱ्यांचा पगार कापतोय आणि खासदारांच्या नेत्यांचे ब्रँडिंग करण्यासाठी पुणे महापालिका 50- 50 लाख रुपयांची खिरापत वाटते..? या सगळ्या गोष्टींची भनक लागल्यामुळेच देशाच्या गृहमंत्र्यांनी आज या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे,” असंही रविंद्र धंगेकर म्हणालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us