AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Well Accicent: पंढरपूर विहीर दुर्घटनेत बचावकार्याला वेग, भाजप नेत्यांनी आधीच वाहिली श्रद्धांजली; पालकमंत्री गोरेंकडून पोस्ट डिलीट

गेल्या सात तासांपासून याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. सोलापूरचे सध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन हे स्वत: घटनास्थळी उपस्थित असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Pandharpur Well Accicent: पंढरपूर विहीर दुर्घटनेत बचावकार्याला वेग, भाजप नेत्यांनी आधीच वाहिली श्रद्धांजली; पालकमंत्री गोरेंकडून पोस्ट डिलीट
| Updated on: Nov 15, 2026 | 6:39 PM
Share

 रवी केल्हेकर, प्रतिनिधी:  Solapur Well Accident News:  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर कोसळल्याने चारजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. गेल्या सात तासांपासून याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. सोलापूरचे सध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन हे स्वत: घटनास्थळी उपस्थित असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपुर तालुक्यातील आंबे येथे निवास शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहीर खोदताना अचानक दगड मातीचा ढिगारा काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. हे कामगार सध्या दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे, या सर्वांना वाचवण्यासाठी गेल्या तास तासांपासून प्रयत्न सुरु आहेत.

कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु

सोलापूरचे सध्याचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन तसेच माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे घटनास्थळी उपस्थित आहेत. या मजुरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी एनडीआरएफचे पथकही दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली आहे. तसेच विठ्ठलाच्या कृपेने सर्व कामगार सुखरुप असावेत अशी भावना आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

दरम्यान, एकीकडे कामगारांना जिवंत वाचवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी देत आहेत तर दुसरीकडे घटनेबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजप नेत्यांनी मात्र असंवेदनशीलता दाखवल्याचे समोर आले आहे. कामगारांचे बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांनी मात्र कामगारांच्या मृत्यूची घोषणा केली तसेच सोशल मीडियावरुन श्रद्धांजलीही वाहिली.

भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष सुभाष मस्के , भाजपाचे माऊली हळनवर व पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. चूक लक्षात आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली पोस्टही डिलिट केली.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर