त्या 12 मिनिटातच खेळ खल्लास, शेवटच्या क्षणी अभियंता काय करत होती? पुणे हादरुन टाकणारं CCTV फुटेज समोर

पुण्यातील हिंजवडी येथील आय टी अभियंता तरुणीने 21व्या मजल्यावरुन उडी घेत स्वत:ला संपवले. आता शेवटच्या क्षणांमध्ये ती काय करत होती हे समोर आले आहे.

त्या 12 मिनिटातच खेळ खल्लास, शेवटच्या क्षणी अभियंता काय करत होती? पुणे हादरुन टाकणारं CCTV फुटेज समोर
Hinjawadi Police
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 05, 2025 | 2:25 PM

पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आयटी अभियंता तरुणीने बिल्डींगच्या 21व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चे आयुष्य संपवले आहे. या तरुणीने नैराश्यातून इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आता तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय केलं हे CCTVमध्ये समोर आलं आहे.

अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असे या आयटी अभियंताचे नाव आहे. ‘सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…’ अशी चिठ्ठी लिहून 25 वर्षीय अभिलाषाने हिंजवडीमधील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना 31 मे च्या पहाटेच्या सुमारास घडली आहे.

वाचा: मुल होण्यासाठी पाठवले 2 पुरुषांकडे, नंतर नवऱ्याने स्वत:च… ऐकून पोलिसही चकीत झाले

शेवच्या 12 मिनिटात काय घडलं?

अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर ती लिफ्टने 21 व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे 4. 42 सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून , या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे.

खोलीतून सापडली चिठ्ठी

प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं म्हटले जात आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेली सुसाइट नोट सापडली आहे. त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे असे लिहिलेलं आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.