AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुल होण्यासाठी पाठवले 2 पुरुषांकडे, नंतर नवऱ्याने स्वत:च… ऐकून पोलिसही चकीत झाले

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेला नवऱ्यानेच 2 पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले. जेव्हा कुटुंबीयांना कळाले...

मुल होण्यासाठी पाठवले 2 पुरुषांकडे, नंतर नवऱ्याने स्वत:च... ऐकून पोलिसही चकीत झाले
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 03, 2025 | 5:21 PM
Share

उत्तर प्रदेशच्या बरेली येथील मीरगंजमध्ये एका महिलेने आपल्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की, दीड वर्षे बाळ न झाल्याने तिच्या पतीने तिला तांत्रिकाकडे नेले, तिथे तिला नशीली औषध देण्यात आली आणि नंतर दोन व्यक्तींना सुपूर्द करण्यात आले, ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती शुद्धीवर आली आणि तिने याचा विरोध केला, तेव्हा तिला मारहाण करून घरातून हाकलून देण्यात आले.

खरंतर, पीडित महिला मूळची पीलीभीत येथील एका गावातील आहे. जून 2023 मध्ये तिचे लग्न बरेलीच्या मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणाशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण जसजसा वेळ निघत गेला आणि तिला मूल झाले नाही, तसतसे तिच्या पती आणि सासरच्यांचे वागणे बदलू लागले. महिलेने आरोप केला आहे की, दीड वर्षे मूल न झाल्याने पती तिला शिवीगाळ करू लागला आणि वारंवार मारहाण करू लागला. एवढेच नव्हे, तर तिच्या इच्छेविरुद्ध पतीने अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

वाचा: प्रेयसीसोबत नको तो व्हिडीओ बनवला, बायकोला दाखवायचा… चुकून एक व्हायरल झाला अन्…

दोघांनी केला बलात्कार

महिलेने आरोप केला आहे की, 12 एप्रिल 2025 रोजी तिचा पती तिला मीरगंज परिसरातील असद नगर गावात राहणाऱ्या गिरधारी नावाच्या तांत्रिकाकडे घेऊन गेला. पतीने सांगितले की, तांत्रिक काही तंत्र-मंत्र करेल, ज्यामुळे मूल होऊ शकते. पण जेव्हा ती तिथे पोहोचली, तेव्हा तांत्रिकाने सांगितले की, मूल होण्यासाठी तिला दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवावे लागतील. त्या वेळी तिथे आधीपासूनच तिच्या पतीचे काही ओळखीचे लोक उपस्थित होते. तांत्रिकाने तिला एक औषध दिले, जे घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर तिला समजले की, दोन व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केला आहे.

सासू आणि नणंदेनेही केला छळ

यानंतर जेव्हा ती घरी परतली आणि तिने आपली सासू व नणंदेला तांत्रिकाकडे घडलेल्या घटनेबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या सासू आणि नणंदेने उलट तिला शिवीगाळ केली, मारहाण करून तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर ती आपल्या माहेरी गेली आणि तिथे आपल्या आई-वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर ती मीरगंज पोलीस स्टेशनला पोहोचली आणि प्रकरणाची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपास सुरू केला

महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी तांत्रिक गिरधारीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू झाला आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत. पीडितेचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तिचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, दोषींना माफ केले जाणार नाही.

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...