MIM बाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? सुप्रिया सुळे म्हणतात विकासासाठी…

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएम (MIM) समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे, असे विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. तर खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.

MIM बाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? सुप्रिया सुळे म्हणतात विकासासाठी...
एमआयएमबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 19, 2022 | 4:21 PM

बारामती : एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या एकत्र येण्याच्या विधानावर राज्यात सध्या वेगवान प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून पुन्हा भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच (Devendra Fadanvis) हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, असे ते म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएम (MIM) समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे, असे विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. तर खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचे असेल तर आलं पाहिजे. समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे. सर्व राज्यांसाठी हे चांगलं आहे, असेही त्या म्हणाल्या. तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी मात्र यावर कडाडून टीका करत भाजपवर आरोप केले आहेत. शिवसेनेबाबत बोलताना मात्र सुप्रिया सुळेंनी मला विषय माहिती नाही म्हणत सावध पवित्रा घेतला आहे.

जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे राज्यात एकच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राजेश टोपे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं ही आमची संस्कृती नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तर शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांनी केली.

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप

शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली, Uddhav Thackeray उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील; नितेश राणेंची टीका

MIMने भाजपविरोध कृतीत दाखवावा; जयंत पाटील यांचं एमआयएमला आव्हान