Video : पुणेकरानों असू करु नका, हा स्टंट जीवावर बेतणार

| Updated on: May 27, 2023 | 11:14 AM

Pune News : बंधाऱ्यातील छोट्याशा जागेवरुन स्टंट करत प्रवास करण्याचा प्रकार कुंडमळा बंधाऱ्यावर सुरु आहे. फक्त काही आंतर वाचवण्यासाठी धोकादायक प्रवास अनेक जण करत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता काही जण नेहमी हा प्रवास करत आहेत.

Video : पुणेकरानों असू करु नका, हा स्टंट जीवावर बेतणार
Follow us on

रणजित जाधव, मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा बंधारा पर्यंटन स्थळ झाले आहे. अनेक जण या ठिकाणी पर्यंटनासाठी येतात. या ठिकाणी असलेल्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्यावरून जवळपासच्या गावातील अनेक जण जात येत असतात. परंतु चारचाकी गाडी जाण्यासारखी जागा नसतानाही काही वाहनधारक जीवावर उदार होऊन प्रवास करत आहे. फक्त काही आंतर वाचवण्यासाठी सुरु असलेला त्याचा हा प्रवास जीवावर बेतणार आहे. यामुळे असे स्टंट कोणीही करु नका, कारण तुमचे जीवन अनमोल आहे, हे लक्षात घ्या.

पर्यायी रस्ता असताना…

हे सुद्धा वाचा

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील बंधारा मृत्यूचा सापळा बनत आहे. या बंधाऱ्यावरून स्थानिकांची सर्रास ये-जा सुरू आहे. अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या या बंधाऱ्यावरून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. चारचाकी वाहनांसह रिक्षा, जेसीबी ही सर्रास बंधा-याचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. वास्तविक नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध असतानाही केवळ कमी वेळात पोहोचण्यासाठी नागरिक या शॉर्टकट रस्त्याचा वापर करून आपल्या जीवावर उदार होताना दिसतात.

जीवावर बेतणारा स्टंट

पाण्याच्या बंधाऱ्यावर वाहन चालकांचा स्टंट जीवावर बेतू शकतो. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या पसंतीस असलेलं मावळातील कुंडमळा धबधब्यावर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटक जातात. परंतु या ब्रिटिश कालीन बंधाऱ्यावरून धोकादायक प्रवास सुरु आहे. शॉर्टकटच्या नादात एक चारचाकी वाहन हे थेट पुलाच्या बाजूला जात पाण्यात पडली. सुदैवाने ह्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या पुलावर वाहतूक करण्यास बंदी असताना ही शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात वाहनांत बसलेल्या प्रवासी यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र सध्या सुरू आहे.

यापूर्वी अनेक वाहने पडली

देहूरोड शेलारवाडी ते कुंडमळा असा 3 किलोमीटरचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. यापूर्वी अनेक वाहने या बंधाऱ्यावरून खाली पडली आहेत तरी ही हा प्रवास सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. बंधाऱ्याच्या आसपास जंगली वनस्पती व जलपर्णी मोठ्या प्रमाणात उगवली आहे.

 

तसेच बंधाऱ्याला आवश्यक असणारा संरक्षक कठडा नाही. त्यानंतरही वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू आहे. याठिकाणी रहदारीसाठी आवश्यक असणारे कोणतेही मार्गदर्शक सूचना फलक येथे लावण्यात आलेले नाहीत.