AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचचा धडकी भरवणारा जाहिरातीचा दर, सामना न झाल्यास प्रचंड नुकसान!

सध्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाल आहे. येत्या 15 फेब्रवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. परंतु या सामन्याबाबत अद्यापतरी अनिश्चितताच आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचचा धडकी भरवणारा जाहिरातीचा दर, सामना न झाल्यास प्रचंड नुकसान!
ind vs pak matchImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 08, 2026 | 9:16 PM
Share

India Vs Pakistan Match : टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. टी-20 विश्वचषकात प्रत्येक वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते. यावेळी मात्र भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनिश्चितता आहे.येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलसोबत चर्चा चालू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना जगभरात कोट्यवधी लोक पाहतात. त्यामुळेच या सामन्यातील प्रत्येक जाहिरातीचा दरही तेवढाच जास्त असतो.

प्रत्येक 10 सेकंदांसाठी किती रुपये आकारले जातात?

हा दर नेमका किती असतो ते जाणून घेऊ या. भारत-पाकिस्तान सामना असेल तर जाहिरातीचा दर गगनाला भिडतो. 2025 आणि 2026 साली भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांकडे पाहता प्रत्येक सामन्यात 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 14 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दर असू शकतो. विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या सामन्यांत भारत-पाकिस्तान सामना चालू असेल तर जाहिरातीचा दर जास्तच वाढतो. आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रत्येक 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 14 ते 16 लाख रुपये दर आकारला होता.

सामना न झाल्यास किती कोटींचे नुकसान होणार?

आजकाल फक्त टीव्हीच नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच कनेक्ट टीव्हीदेखील जाहिरातीसाठी महत्त्वाचे मंच आहेत. या मंचावरही जाहिरात द्यायची असेल तर प्रत्येक 10 सेकंदासाठी 25 ते 30 लाख रुपये घेतले जातात. दरम्यान, येत्या 15 फेब्रुवारी रोजीचा भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान होऊ शकते.नुकसानीचाहा आकडा थेट 200 ते 250 कोटीच्या घरात जाऊ शकतो. त्यामुळे आता हा सामना होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

15 फेब्रुवारी रोजी मॅच किती वाजता होणार?

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत अजूनही अनिश्चितताच आहे. परंतु वेळापत्रकाप्रमाणे हा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता चालू होणार आहे. या दिवशी रविवार असणार आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश