Pimpri chinchawad crime | सायबर चोरट्यांकडून महापालिका आयुक्तांच्या प्रोफाईलचा वापर; आर्थिक मदतीची मागणी ; फसवणुकीला बळी न पडण्याचेआयुक्तांचे आवाहन

| Updated on: Jan 18, 2022 | 5:29 PM

सायबर चोरांकडून या पद्धतीने होत असलेल्या फसवणुकीला नागरिकांनी बळी पडू नये. याबाबत महानगरपालिके एका प्रसिद्धीपत्रक काढले आहे यामध्ये वरील कर्म क्रमांकावरून तसेच क्रमांकावरुन फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही आर्थिक व्यवहार करून नका.

Pimpri chinchawad crime | सायबर चोरट्यांकडून महापालिका आयुक्तांच्या प्रोफाईलचा वापर; आर्थिक मदतीची मागणी ; फसवणुकीला बळी न पडण्याचेआयुक्तांचे आवाहन
Rajesh Patil
Follow us on

पिंपरी- शहरात वाढत्या गुन्हेगारीबरोबर सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र आता सायबर चोरट्यांनी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनाच टार्गेट केल्याचे आहे. सायबर चोरट्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या  फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींग केल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर चोरट्यांनी या प्रोफाईल वापर करत नागरिकांची फसवणूक केल्याचे ही समोर आले आहे.

अशी होतेय फसवणूक
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या  फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर केला जातोय. याबाबत सायबर पोलिसात तक्रर देण्यात आली आहे. चोरट्यांकडून मोबाईल क्र. 7524891151 या नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग केली जात आहेत. तसेच त्यांच्याकडे आर्थिक मदतीची विचारणा केली आहे. याबाबत महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेल कडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे.  मोबाईल क्र. 7977510080 ( या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.

फसवणुकीला बळीं पाडण्याचे आवाहन
सायबर चोरांकडून या पद्धतीने होत असलेल्या फसवणुकीला नागरिकांनी बळी पडू नये. याबाबत महानगरपालिके एका प्रसिद्धीपत्रक काढले आहे यामध्ये वरील कर्म क्रमांकावरून तसेच क्रमांकावरुन फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही आर्थिक व्यवहार करून नका. अश्या प्रकारे कुणीही आर्थिक मागणी केल्यास त्याची पोलिसांना माहिती द्या. आयुक्तांकडून अश्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक स्वरूपाच्या मदतीची मागणी केली जात नसल्याची नोंद घ्यावी असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

Corona in India: कोरोना चाचण्या वाढवा, चिठ्ठी लिहून केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना

फडणवीस यांना काशीचा काशीचा घाट दाखवू म्हणणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई व्हावी : चंद्रकांत पाटील

Gold Price Today : दिल्लीत सोने 50 हजार पार, जाणून घ्या-महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातील ताजे भाव