Solapur Gram Panchayat Election Results 2021: अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व कायम; सत्ता राखली

| Updated on: Jan 18, 2021 | 2:23 PM

अकलूज ग्रामपंचायत निडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलने वर्चवस्व कायम राखलं आहे. (vijay singh mohite patil panel won in akluj gram panchayat election)

Solapur Gram Panchayat Election Results 2021: अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व कायम; सत्ता राखली
Follow us on

सोलापूर: अकलूज ग्रामपंचायत निडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलने वर्चवस्व कायम राखलं आहे. मोहिते-पाटील यांच्या पॅनलने 16 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील गटाच्या संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे. (vijay singh mohite patil panel won in akluj gram panchayat election)

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनेलने अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर धरला होता. त्याला अकलूजच्या मतदारांनी कौल दिला आहे. या निवडणुकीत अकलूज ग्रामपंचायतीवर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलचे 16 पैकी 13 उमेदवार विजयी झाले आहेत. या पॅनलचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. लोकांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांनी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांना नाकारल्याचं दिसून येत आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील पॅनलचे गिरीराज माने-पाटील यांनी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला आहे. तर ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांनी पराभव केला आहे. संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच अकलूज ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषविलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

अकलूज ग्रामपंचायतीचा पहिला बिनविरोध निकाल धवलसिंह मोहिते-पाटील पॅनलच्या बाजूने गेला होता. त्यामुळे अकलूजच्या ग्रामपंचायतीचा कल कुठल्या दिशेने जाणार याची चुणूक जाणवली होती. पण प्रत्यक्षात जसजशी मतमोजणी सुरू झाली तसतसा कल स्पष्ट होऊ लागला. आजच्या निकालात धवलसिंह मोहिते-पाटील पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटलांना या निवडणुकीत मोठी मजल मारता आली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्याचाही विजयसिंह मोहिते-पाटलांचा प्रयत्न होता. त्याला काहीसं यश आल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (vijay singh mohite patil panel won in akluj gram panchayat election)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांचा धक्का

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

(vijay singh mohite patil panel won in akluj gram panchayat election)