निवडणूक आयोग कसली झक मारतोय? भाजप उमेदवार थेट निवडणूक चिन्ह असलेला गमछा घालून मतदान केंद्रावर, मेहबूब शेख यांच्या Video ने खळबळ

Mehboob Shaikh attack on Election Commission: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेतील हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून शेख यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोग कसली झक मारतोय? भाजप उमेदवार थेट निवडणूक चिन्ह असलेला गमछा घालून मतदान केंद्रावर, मेहबूब शेख यांच्या Video ने खळबळ
भाजप उमेदवार थेट निवडणूक चिन्ह असलेला गमछा घालून मतदान केंद्रावर, मेहबूब शेख यांच्या Video ने खळबळ
| Updated on: Oct 23, 2026 | 12:42 PM

Mehboob Shaikh attack on Election Commission: आज पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेतील हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

भाजप उमेदवाराचे पक्षाचा रूमाल घालून मतदान

Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांची निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर जाऊन ट्विटद्वारे टीका केली आहे. “पुणे शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी भाजप पक्षाचा पंचा घालून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यात आल आहे यासंदर्भात निवडणूक आयोग काही कारवाई करणार आहेत का? की निवडणूक आयोग भाजपचे तळवे चाटण्यात धन्यता मानणार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.” असा सवाल मेहबूब शेख यांनी विचारला आहे.

आयोगावर शेख यांचा निशाणा

“भाजपाचे पुणे शिक्षक विधानपरिषदेचे उमेदवार कौस्तुभ गावडे पक्षचिन्ह असणार पक्षाचा पंचा घालून मतदानाला जातोय.निवडणूक आयोग आणि त्यांचे कर्मचारी नेमकी कसली झक मारत आहेत? निवडणूक आयोग यावर ॲक्शन घेणार का? की अजून ही भाजपचे तळवे चाटण्यातच धन्यता मानणार आहे?” अशी टीका मेहबूब शेख यांनी आयोगावर केली आहे.

अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा आरोप

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पैशाचा अमाप वापर होत असल्याचा माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी आरोप केला आहे. मागील 48 तासात कांही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक दबाव तयार करण्याचं काम केलं आहे. पैसे वाटण्याचा धंदा केला आहे, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात हा दुर्दैवी प्रकार आहे. काही उमेदवार हे शिक्षकांच्या घरी जाऊन पैसे देण्याचा प्रयत्न करत होते. पैशाचा वापर करणाऱ्या उमेदवारांचे मी नावे ही घेऊ शकतो मात्र मी संस्कारी असल्यामुळे त्यांची नावे घेत नाही. जाहीरपणाने संपूर्ण 5 जिल्ह्यातील 58 तालुक्यात एक उमेदवार प्रति शिक्षक 11 हजार, 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रूपये प्रमाणे पैसे वाटत आहेत, असा आरोप सावंत यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us