Pune accident : दुचाकीच्या धडकेनं रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून गेलं पीएमपीचं चाक!

| Updated on: Apr 18, 2022 | 4:53 PM

पीएमपीच्या (PMPML) चाकाखाली येवून महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. दुचाकीच्या धडकेने पादचारी महिला रस्त्यावर पडली होती. या रस्त्यावर पडलेल्या पादचारी महिलेच्या अंगावरून पीएमपी बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी (Injured) झाली.

Pune accident : दुचाकीच्या धडकेनं रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून गेलं पीएमपीचं चाक!
पीएमपीएमएल (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पीएमपीच्या (PMPML) चाकाखाली येवून महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. दुचाकीच्या धडकेने पादचारी महिला रस्त्यावर पडली होती. या रस्त्यावर पडलेल्या पादचारी महिलेच्या अंगावरून पीएमपी बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी (Injured) झाली. रविवारी रात्री आठच्या सुमारास शिवाजी रस्त्यावर लाल महालाजवळ ही घटना घडली. अनिता पवार असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला लाल महालाजवळ पायी जात असताना तिला एका दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे या महिलेचा तोल जाऊन ती महिला रस्त्यावर पडली. त्याचवेळी चिंचवडहून शनिवारवाडा, लाल महालमार्गे कात्रजला जाणाऱ्या पीएमपीएमएल बसचे मागील चाक महिलेच्या अंगावरून गेले. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली.

प्रकृती चिंताजनक

काही नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा :

RPI Sachin Kharat : धर्माच्या नावाखाली राजकारण; राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये, पुण्यात सचिन खरातांची मागणी

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

Mumbai HC : न केलेल्या गुन्ह्याची 12 वर्षे भोगली शिक्षा! पुण्यातल्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून चौघांची मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका