विद्येच्या माहेरघरात अघोरी प्रकार, मूल होत नाही म्हणून…

पुण्यामध्ये मुलबाळ होत नसल्यामुळे अघोरी पूजा करून त्यामध्ये मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके यांचा वापर करण्यात आला आहे.

विद्येच्या माहेरघरात अघोरी प्रकार, मूल होत नाही म्हणून...
| Updated on: Jan 19, 2023 | 9:21 PM

पुणेः महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या भागात अंधश्रद्धेच्या नावाखाला काहीही प्रकार सुरू आहेत. श्याम मानव आणि बागेश्‍वर ऊर्फ धीरेंद्र महाराज यांचे प्रकरण ताजे असतानाच पु्ण्यातही एक अघोरी प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खावू घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्यामुळे राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करत आयोगास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

पुण्यात हा प्रकार घडल्यानंतर समुपदेशक आणि प्रकल्प अधिकारी अंजनी काकडे यांच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेत या प्रकरणाचा तपास सिंहगड पोलिसांनी करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अंजनी काकडे यांनी सांगितले आहे की, पुण्यामध्ये मुलबाळ होत नसल्यामुळे अघोरी पूजा करून त्यामध्ये मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके यांचा वापर करण्यात आला आहे.

त्यानंतर हाडाची पावडर करून विवाहितेला जबरदस्तीने खायला लावली आहे. तसेच स्मशानभूमीतून हाडे, राख आणून त्याची पूजा करून ती राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यास दिल्याची घटना सोशल माध्यमाद्वारे प्रसारित झाली होती.

त्यामुळे या अघोरी प्रकल्पाची माहिती राज्य महिला आयोगाने घ्यावी अशी मागणी अंजली काकडे यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेत महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात हा प्रकार घडल्या नंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंजली काकडे यांनी सोशल मीडियाद्वारे हा अघोरी प्रकार व्हायरल झाल्यानंतर या प्रकारची दखल महिला आयोगानेही घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती.