मराठा आरक्षण मोर्चा पुढे ढकला; विखे-पाटील भेटणार संभाजीराजेंना

| Updated on: Jun 07, 2021 | 3:45 PM

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या 16 जून रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. (radhakrishna vikhe patil will meet sambhaji chhatrapati to discuss maratha reservation issue)

मराठा आरक्षण मोर्चा पुढे ढकला; विखे-पाटील भेटणार संभाजीराजेंना
Radhakrishna Vikhe Patil
Follow us on

चंदन पुजाधिकारी, टीव्ही, 9 मराठी, नाशिक: खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या 16 जून रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तर, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा आरक्षण मोर्चा पुढे ढकलण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भात विखे-पाटील लवकरच संभाजी छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. (radhakrishna vikhe patil will meet sambhaji chhatrapati to discuss maratha reservation issue)

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपचे सर्व मराठा समाजातील आमदार, खासदार तसेच नगरसेवक देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे आवाहन केलं. येत्या दोन दिवसात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा करून सर्व मराठा संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संभाजीराजेंनी 16 तारखेच आंदोलन पुढे ढकलण्याची विनंतीही त्यांना भेटून करणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितलं.

संभाजीराजे-मेटेंना एकत्रित आणणार

येत्या दोन दिवसात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील सर्व संघटना आणि नेत्यांना एकत्रित बोलावण्यात येणार आहे. नेते आणि सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी या सर्वांना एकत्र आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा आंदोलनाबाबत मतमतांतरे?

मराठा आरक्षणाचं आंदोलन कुणी एकट्याने करू नये. या आंदोलनाला सामूहिक नेतृत्व असावं, असं मत विखे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तर, संभाजीराजेंच्या समर्थकांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन 16 जूनच्या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलकांमध्येच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. (radhakrishna vikhe patil will meet sambhaji chhatrapati to discuss maratha reservation issue)

 

संबंधित बातम्या:

राज्यात 23 मराठा संघटना काम करतात, मग भूमिका वेगळी का? विखे-पाटलांचं संभाजीराजेंना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न: सचिन सावंत

(radhakrishna vikhe patil will meet sambhaji chhatrapati to discuss maratha reservation issue)