माझा फोन टॅप केला जातोय; राहुल गांधी यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेस खासदार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. या आरोपाने खळबळ उडाली आहे.

माझा फोन टॅप केला जातोय; राहुल गांधी यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
rahul gandhi news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 1:17 PM

काँग्रेस खासदार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. माझा फोन टॅप केला जातोय, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी फोन टॅपिंग वरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी आरोप करताना म्हटलं की, मी केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. या फोनला पंतप्रधान मोदी टॅप करत आहेत. समोरासमोर चर्चा केल्यानंतर स्पष्ट होईल की, परकीय देशांच्या इशाऱ्यांवर कोण काम करत आहे. तसेच कोण किती देशद्रोही आणि किती काळापासून देशद्रोहाच्या कामात सामील आहे, हे समजेल. मला ज्ञात असलेली बरीच माहिती माझ्या फोनमध्ये आहे’.

Loading...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेच आव्हान दिले.  समोरासमोर चर्चा केली, तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहणार नाहीत’, असा टोा राहुल गांधींनी लगावला. तर राहुल गांधी यांना विचारण्यात आले की, भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असताना, त्यांना सार्वजनिक ठिकाणी चर्चेचा आग्रह का करत आहात, त्यावर ते म्हणाले, मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. माझा माईक बंद करण्यात येतो’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us