AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : आज मुख्यमंत्र्यांची सभा, त्याआधी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला बसू शकतो मोठा धक्का

Sharad Pawar : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथे विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. त्याआधी ही निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला धक्का बसू शकतो. एका नेत्याच्या भूमिकेकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे.

Sharad Pawar : आज मुख्यमंत्र्यांची सभा, त्याआधी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला बसू शकतो मोठा धक्का
Sharad Pawar-Devendra Fadnavis
| Updated on: Apr 20, 2026 | 10:57 AM
Share

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका लागल्या आहेत. एका बारामती विधानसभा आणि दुसरी राहुरी विधानसभा. अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान नाहीय. कारण महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा विजय सहज आहे. पण राहुरीत अशी स्थिती नाहीय. आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. भाजपने राहुरीमध्ये शिवाजीराव कार्डिले यांचे सुपूत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांची अक्षय कार्डिले यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी शक्यता होती. पण प्राजक्त तनपुरे यांनी ही पोट निवडणूक लढवू नये अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची इच्छा होती. त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राहुरीमधून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली. आता प्राजक्त तनपुरे अक्षय कार्डिले यांना पाठिंबा देणार का? ते आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतील. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे थोड्याच वेळात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

आतापर्यंतची भूमिका भाजपला अनुकूल

कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार आहेत. राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे नेमकी कुणाला पाठींबा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मतदारसंघातील निवडक कार्यकर्त्यांसोबत साधणार संवाद. प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात अशी स्थिती आहे. प्राजक्त तनपुरे यांची या निवडणुकीतील भूमिका पाहिली, तर ती भाजपला अनुकूल राहिली आहे. त्यांनी आज अक्षय कार्डिले यांना पाठिंबा दिला किंवा भाजपत प्रवेश केला, तर तो शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का असेल. प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रीपद भूषवलेलं आहे. राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांवर प्राजक्त तनपुरे यांचं वर्चस्व आहे. तनपुरे कुटुंबाला राहुरीमध्ये मान,सन्मान आहे.

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा.

Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार