रायगड जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठीचं आरक्षण जाहीर, रायगड जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार!

| Updated on: Jul 29, 2022 | 12:05 PM

रायगड जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार!

रायगड जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठीचं आरक्षण जाहीर, रायगड जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार!
Follow us on

रायगड : न्यायालयाच्या आदेशानंतर रायगड जिल्हा परिषद (Raigad Zilla Parishad) आणि पंचायत समित्यांसाठी फेरआरक्षण जाहीर (Reservation Announced) करण्यात आलं आहे. यामध्ये 66 गटांतील 34 जागा महिलांसाठी राखीव झाल्याने जिल्हा परिषदेवर महिलांचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे. अनुसूचित जाती- 3 पैकी 2,अनुसूचित जमाती 10 पैकी 5, ओबीसी- 17 पैकी 9 तर सर्वसाधारण जागांमधील 36 पैकी 18 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. पंचायत समितीच्या 132 गणांबरोबर मुरुड, रोहेनगर परिषदेसाठीही फेरआरक्षण जाहीर झालं आहे. पुन्हा आपल्याला संधी मिळेल म्हणून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करणाऱ्यांचा आरक्षण जाहीर झाल्याने हिरमोड झाला आहे.

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठीचं आरक्षण :

चेंढरे (सर्वसाधारण), चौल (सर्वसाधारण महिला), बेलोशी (ओबीसी महिला). मुरुड- उसरोली (सर्वसाधारण महिला), राजपुरी (ओबीसी). रोहा – नागोठणे (सर्वसाधारण महिला), आंबेवाडी (सर्वसाधारण महिला), निडी त. अष्टमी (सर्वसाधारण महिला), वरसे (अनुसूचित जमाती महिला), घाटाव (सर्वसाधारण). तळा महागाव (ओबीसी), मांदाड (अनुसूचित जमाती महिला). माणगाव- तळाशेत (अनुसूचित जमाती महिला), निजामपूर (सर्वसाधारण), लोणेरे (अनुसूचित जमाती महिला), मोर्वा (सर्वसाधारण), गोरेगाव (सर्वसाधारण महिला). म्हसळा- पाभरे (सर्वसाधारण), वरवठणे (सर्वसाधारण). श्रीवर्धन बोली पंचतन (ओबीसी), बागमांडला (ओवीसी महिला). महाड- बिरवाडी – (अनुसूचित जमाती), वरध (सर्वसाधारण महिला), नाते (अनुसूचित जमाती महिला), वहूर (ओबीसी महिला), करंजाडी (सर्वसाधारण). पोलादपूर – देवळे (सर्वसाधारण महिला), लोहारे (सर्वसाधारण)

पनवेल- वावंजे (ओबीसी महिला), नेहेरे (ओबीसी), पालीदेवत (सर्वसाधारण), विचुंबे (अनुसूचित जाती महिला), वावेघर (अनुसूचित जमाती), पळस्पे (अनुसूचित जमाती), वडघर (सर्वसाधारण), गव्हाण (ओबीसी महिला), केळवणे (ओबीसी महिला). कर्जत – कळंब (सर्वसाधारण), पात्रज (सर्वसाधारण) उंबरोली (सर्वसाधारण), नेरळ (ओबीसी), सावेळे (सर्वसाधारण महिला), बीड बु. ( सर्वसाधारण महिला). खालापूर हाळखुर्द (सर्वसाधारण), चौक (सर्वसाधारण), रिस (अनुसूचित जाती), सावरोली (ओबीसी महिला)

हे सुद्धा वाचा

आत्करगाव ( सर्वसाधारण महिला). सुधागड जांभूळपाडा (सर्वसाधारण महिला), राबगाव (सर्वसाधारण). पेण- जिते (सर्वसाधारण महिला), दादर (सर्वसाधारण महिला), वढाव (सर्वसाधारण महिला), वडखळ (सर्वसाधारण महिला) पाबळ – (ओबीसी महिला), शिहू (सर्वसाधारण) उरण जासई (सर्वसाधारण), चिरनेर (अनुसूचित जमाती), नवघर (सर्वसाधारण महिला), चाणजे (अनुसूचित जाती महिला), बांधपाडा (ओबीसी). अलिबाग -शहापूर (अनुसूचित जमाती), कुर्डुस ओबीसी महिला), कामाला (सर्वसाधारण), मापगाव (ओबीसी), थळ (ओबीसी)

15 पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर

रायगड जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांसाठीही निवडणूक होणार आहे. 132 गणांसाठी फेरआरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये पनवेलमधील 18 जागांपैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. म्हसळ्यात वरवटणे आणि पाभरे गण सर्वसाधारण महिलांसाठी, मेंदडी ओबीसी आणि आंबेत सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्या आहेत. कर्जतमध्ये 12 पैकी पोशीर, नेरळ, पिंपळोली, बीड बु. हे गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. उरणमध्ये 10 पैकी जसकार, जासई, विंदणे आणि म्हातवली हे गण महिलांसाठी राखीव असून केगाव, चाणजे, बांदपाडा, आवरे हे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहेत. रोह्यात 10 पैकी नागोठणे, खांब, वरसे, कोकबन, भालगाव महिलांसाठी आरक्षित आहेत. महाडमध्ये 10 गणांपैकी खरवली, बिरवाडी, नडगाव, अप्पर तुडील, सवाणे या जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. रोहा, मुरुड, माथेरान, बदलापूर नगर परिषदेसाठीही फेरआरक्षण काढण्यात आलेत.