Raigad Electricity : श्रीवर्धनमध्ये 24 तास बत्ती गुल, पालकमंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातला प्रकार, पहिल्या पावसातच तारांबळ

| Updated on: Jun 11, 2022 | 11:18 PM

10 जुन रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसामुळे 24 तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे लोकही वीजेची वाट बघून बघून वैतागले आहेत. ही दुसरूस्ती लवकरात लवकर करावी आणि वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Raigad Electricity : श्रीवर्धनमध्ये 24 तास बत्ती गुल, पालकमंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातला प्रकार, पहिल्या पावसातच तारांबळ
श्रीवर्धनमध्ये 24 तास बत्ती गुल
Image Credit source: tv9
Follow us on

रायगड : गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण केलं होतं. त्यामुळे सगळेच जण पावसाची (Heavy Rain) वाट बघत होते. मात्र पहिला पाऊस आला आणि लोकांची वेगळ्याच कारणामुळे तारंबळ सुरू झाली. कारण मुसळधार पावसाने श्रीवर्धनमध्ये 24 तास उलटूनही वीज प्रवाह खंडित (Electricity cut)असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजदे पालकमंत्री अदिती तटकरेंच्या मतदारसंघातला हा प्रकार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागिक सध्या हैराण झाले आहेत. इतर ठिकाण प्रमाणेच रायगड (Raigad Powar Outage) जिल्ल्यातील श्रीवर्धन तालुक्यातही यंदाच्या पहिलाच पाऊसात दणादण उडाली आहे. 10 जुन रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसामुळे 24 तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे लोकही वीजेची वाट बघून बघून वैतागले आहेत. ही दुसरूस्ती लवकरात लवकर करावी आणि वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

पहिल्याच पावसात तारांबळ

7 जुन रोजी पावसाने रिमझीम पडून आपली हजेरी लावली होती. परत 3 दिवसांच्या विश्रांती नंतर 10 तारखेला मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे श्रीवर्धन मधील पाभरा येथून श्रीवर्धन सबस्टेशनला येणाऱ्या मुख्यवाहिनी वरून वीजेचा झोत गेल्यामुळे १० इन्सुलेटर निकामी झाले. तसेच पाभरा ते श्रीवर्धन मार्गावर बहुतेक ठिकाणी बिघाड झाल्याने दुरूस्तीचे काम सुरू होते. तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. आठवड्यातून 2 वेळा पोल, ट्रान्सफार्मर, वायर्स तसेच इतर देखभाल व दुरूस्ती साठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडीत केला जात होता. तसेच दिवसाआड काहीना काही कामानिमित्ताने वीज पुरवठा खंडीत होत असतो. असे असुन सुद्धा वीज देयकामधे कायम वाढ होत आहे.

या त्रासातून कधी सुटका होणार?

पहिल्या पावसाने महावितरण सेवेची हि अवस्था झाली तर सप्टेंबर महिन्यापर्यंत महावितरण ग्राहकांना अजून किती झटके देणार असा प्रश्न केला जातं आहे. ? पडलेल्या विजेची क्षमता किती होती ? निकामी झालेल्या इंसुलेटरची क्षमता विजेची झोत झेलण्याची नव्हती का ? मेंटेनेस साठी वीज पुरवठा खंडित होत होता त्या वेळेला हे महावितरण कर्मचारी यांच्या लक्षात आले नाही का ? महावितरण विभागाला पुरवठा होणारा साहित्य कोणत्या दर्जाचे आहे. याची चौकशी होण्याची गरज असून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून महावितरण सुटका करणार का असेही बोलले जात आहे. श्रीवर्धन महावितरण कार्यालयात प्रभारी उप अभियंता म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे तेच कायम संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे ग्राहकांनी आपल्या व्यथा मांडायच्या कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.