Video | Salman Khan | सलमानला चावलेला साप अखेर पकडला, साप अजूनही जिवंत, विषारी होता का?

वाढदिवस तोंडावर आलेला असताना दबंग अभिनेता सलमान खानला साप चावला होता. 25 डिसेंबरच्या रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये ही घटना घडली होता.

Video | Salman Khan | सलमानला चावलेला साप अखेर पकडला, साप अजूनही जिवंत, विषारी होता का?
सलमान खानला चावलेला साप
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 7:30 PM

पनवेल : सलमान खानला ज्या सापानं चावलं होतं, तो साप अखेर पकडण्यात आला आहे. एका बाटलीत या सापाला बंद करण्यात आलं आहे. हा साप एमजीएम (MGM Hospital) रुग्णालयात ठेवण्यात आला असून सध्या या सापाबाबत चौकशी करत आहेत. हा साप विषारी होता की बिनविषारी होता, याचा शोध घेतला जातो आहे.

आता डॉक्टर हा साप विषारी होता की नव्हता, याची पडताळणी करत आहेत. खरंच हा साप विषारी होता का, हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, सध्या एका बाटलीत या सापाला पकडण्यात आलं असून पुढील तपास आता एमजीएममधील तज्ज्ञ लोकांकडून केला जातो आहे.

पाहा व्हिडीओ –

कधी चावला होता साप?

वाढदिवस तोंडावर आलेला असताना दबंग अभिनेता सलमान खानला साप चावला होता. 25 डिसेंबरच्या रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये ही घटना घडली. सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती स्थिर असून MGMच्या डॉक्टरांच्या टीमने सलमानचं हेल्थ चेकअप केले आहे. त्यासाठी डॉक्टरांची टीम सलमानच्या फार्म हाऊसवर दाखल झाली होती.

बर्थडेसाठी सलमान पनवेलला

दरम्यान, सलमान खानचा 27 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सलमानला आपला वाढदिवस जवळचे मित्र तसेच आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करायचा होता. यावेळी फार्म हाऊसवर आपल्या मित्रांसोबत गप्पा करताना सलमानला सापाने दंश केला होता. सुरुवातीला एमजीएम रुग्णालयात सलमानला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर उपचाराअंती सलमान खानला डिस्चार्जही देण्यात आला होता. सध्या सलमान खान पनवेलमधीलच आपल्या फार्म हाऊसवर आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.

संबंधित बातम्या –

Salman Khan Snake Bite | सलमान खानच्या फार्म हाऊसवर डॉक्टरांची टीम दाखल, साप चावल्यानंतर दबंग अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी नवे अपडेट्स

Salman Khan | चावला साप, आठवला काळवीट, मीमर्स म्हणाले, ‘सलमानला चावलेला साप आयसीयूत!’

धक्कादायक! आधी औषधाचा ओव्हरडोस, मग अपहरणाचा बनाव, 5 महिन्याच्या बाळाला आईनंच संपवलं