AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील या भागात मुसळधार पाऊस, दुहेरी संकट, पुढील तास धोक्याची, हवामान विभागाने…

Weather Update Maharashtra : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली.

राज्यातील या भागात मुसळधार पाऊस, दुहेरी संकट, पुढील तास धोक्याची, हवामान विभागाने...
Weather Update Maharashtra
| Updated on: Apr 21, 2026 | 11:51 AM
Share

भारतीय हवामान विभागाने दोन दिवस पावसाचा इशारा दिला. राज्यावरील पावसाचे संकट काही दूर होत नाही. आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईत आज पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात ढगाळ वातावरण असून विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवसभर पावसाची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली आहे. आज सकाळच्या सुमारास बदलापुरात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे होता. त्यानंतर सकाळी ढग भरून आले आणि बदलापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसलाय. सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत पावसाने हजेरी लावल्यामुळे चाकरमान्यांना भिजत भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागलय.

कर्जत शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. रस्त्यावर भाजीपाला आणि फळ विक्री करणाऱ्या तारांबळ उडाली असून कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाची धांदल उडाली आहे. उष्ण वातावरणात असल्याने काही लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करत होते, त्यांना या पावसात छत्रीचा दुहेरी फायदा झाला आहे.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये आज सकाळपासून अवकाळी पाऊसाने जोरदार सुरुवात केली. घोडेवाले, रिक्षावाले यांची चांगलीच तारांबळ उडाली. माथेरान बाजारपेठेत रानमेवा घेऊन बसणाऱ्या आणि टपरीवाल्यांची पावसामुळे धांदल उडाली. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असल्याने या अवकाळी पावसाने वातावरणात अजूनच आल्हाददायक वातावरण झाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्यानुसार मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस नांदेड जिल्ह्यात सुरू आहे. भोकर तालुक्यातील काही गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सकाळी थंडी, दुपारी उकाडा आणि रात्री पाऊस असा सुरुये निसर्गाचा खेळ

पंधरा दिवसानंतर आज पुन्हा अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसरात चांगली हजेरी लावली. मेघगर्जना आणि विजाचा कडकडाट करत पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी पडल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि सुमारे अर्धातास दमदार पाऊस झाला. तिकडे बागलाण भागात देखील चांगला पाऊस झाला तळवाडे येथें नारळाच्या झाडावर वीज पाडून झाडं जळून खाक झाला. अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले. वाळू घातलेल्या हळदीच्या ताडपत्री वरून वाहत आहे पाणी.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...