ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा, गुणरत्न सदावर्ते आक्रमक, म्हणाले पितळं उघडं पाडणार…

येत्या 4 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुख्य  निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांच्या विरोधात मुंबईमध्ये महामोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. यावरून आता सदावर्ते यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा, गुणरत्न सदावर्ते आक्रमक, म्हणाले पितळं उघडं पाडणार...
gunratna sadavarte
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 9:16 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुख्य  निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांच्या विरोधात मुंबईमध्ये महामोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी सहभागी व्हावं असं आवाहान देखील राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान यावरून आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांचा 4 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी होणार नाही, मुंबई बंद, रस्ते बंद केल्यास नागरिकांना त्रास होईल. राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांना घाबरणार नाही, राज ठाकरेंचं पितळ उघडं पाडणार, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या मोर्चाआधीच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे यांचं शेतकरी आंदोलन हे स्क्रिप्टडेट आहे. शेतकऱ्यांच्या भावनांवर राजकारण करू नये, मी कॉर्पोरेट शेतकरी नाही, सोयाबीनचा शेतकरी आहे, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.  दुष्काळाची मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहचली पाहिजे,  शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्नधान्य राशन द्या. दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने आदेश काढा, अशी मागणी देखील यावेळी सदावर्ते यांनी केली आहे.

दरम्यान सध्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर हा वादाचा विषय बनला आहे. काही जणांकडून डीजेच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी सुरू आहे, तर काही जणांकडून डीजेचं समर्थन केलं जात आहे. यावर देखील सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या डीजेसंदर्भातील निर्णयाचा अभ्यास करणार आहे. जर अधिकारांचं हनन होत असेल तर कायदेशीर मार्गाने दाद मागणार आहे. आगामी देवीच्या उत्सवातही उत्साह कायम राहणार आहे. संस्कृती आणि व्यक्त होण्याच्या प्रक्रियेला दडपता येणार नाही, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us