AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIR संदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय संमतीनेच, निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

विशेष सखोल पुनरावलोकन ( एसआयआर )  प्रक्रियेसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी शनिवारी एक बैठक घेतली.

SIR संदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय संमतीनेच, निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
Gyanesh Kumar
| Updated on: Sep 26, 2026 | 10:09 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी अनेक आक्षेप घेतल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात या दोन्ही निवडणूक आयुक्तांनी गेल्या १० महिन्यांत तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले असल्याचा दावा या बातमी केला होता. मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (SIR) आणि फॉर्म-६ मधील बदलांसारखे निर्णय एकतर्फी आणि अनधिकृत पद्धतीने घेतले होते. या आदेशा संदर्भात आपल्याला अंधारात ठेवले गेले आणि विश्वासात घेतले नाही,असाही दावा या दोन आयुक्तांनी केला होता.आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टी करण दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मतदान यादीचे विशेष पुनरीक्षण (SIR) संबंधित सर्व निर्णय सर्वसंमतीने घेतलेले असल्याचे म्हटले आहे. देशभरात SIR लागू करण्याचा निर्णय देखील आयोगाच्या सर्व सदस्यांच्या संमतीने घेतलेला होता असे आयुक्तांनी स्पष्ट आहे.

आयोगाने म्हटले की २४ जून २०२५ रोजी बिहारामधून सुरु होऊन पश्चिम बंगाल आणि ३० अन्य राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात SIR करण्याचा आदेश सर्वसंमतीने जारी केला होता. आयोगाने म्हटले की हा निर्णय सुप्रीम कोर्टाने देखील २७ मे २०२६ च्या आदेशात कायम ठेवला आहे.

आयोगाच्या मते १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात SIR चा कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होात. मात्र १९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी कार्यक्रम १४ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. आयोगाने स्पष्ट केले आहे की दोन्ही प्रकरणातील निर्णय सर्वसंमतीने घेतला गेला होता.

निवडणूक आयोगाने हे देखील स्पष्ट केले की देशात मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षणा ( SIR ) नंतर मतदारांची अंतिम संख्या अजून निश्चित झालेली नाही. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित १२ राज्यात अंतिम मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदारांची एकूण संख्या स्पष्ट होईल. आयोगाने हे देखील सांगितले की ज्या मतदारांना मतदान यादीत कोणत्याही प्रकारची विसंगती संदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठीची प्रक्रीया सोपी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

ज्यांची नावे मतदान यादीत आली नाही. किंवा ज्यांना नोटिस आली आहे त्यांच्या घरी BLO स्वत:जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर)  प्रक्रियेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्तांनी शनिवारी एक बैठक घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. एस. एस. संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे दुपारी ३ वाजता भेट झाली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?