औरंगाबाद नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळेल; आठवलेंचं भाकीत

औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बेबनाव असतानाच रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता या वादात उडी घेतली आहे. (ramdas athawale criticized maha vikas aghadi over Aurangabad rename issue)

औरंगाबाद नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळेल; आठवलेंचं भाकीत
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

पालघर: औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बेबनाव असतानाच रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता या वादात उडी घेतली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून वाद होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं भाकीत वर्तवतानाच ठाकरे सरकारने या वादात पडू नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे. (ramdas athawale criticized maha vikas aghadi over Aurangabad rename issue)

पालघर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी हे भाकीत वर्तवलं. औरंगाबादचं नामांतरच करायचं होतं तर युती सरकार असताना का केलं नाही? असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठारे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही. लवकरच हे सरकार कोसळणार असून राज्यात भाजप-रिपाइंचं सरकार येणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. यावेळी औरंगाबादच्या नामकरणाच्या अनुषंगाने कविता ऐकवली. ‘औरंगाबाद या संभाजी के नामकरण के पीछे मत पडो और काँग्रेस और शिवसेनावालों आपस मे मत लड़ो,’ अशी कविता आठवले यांनी करताच एकच खसखस पिकली.

उपमहापौर रिपाइंचाच

मुंबई महापालिकेत यावेळी भाजपची सत्ता येणार आहे. मुंबई महापालिकेत यावेळी भाजपचा महापौर आणि रिपाइंचा उपमहापौर बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

पवारांना शुभेच्छा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यूपीएचे चेअरमन होण्याची शक्यता आहे. त्यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याची मागणी होत आहे. पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण काँग्रेसचा त्याला विरोध असल्याने ते यूपीएचे चेअरमन होतील असं वाटत नाही, असं सांगत आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला.

… तर संविधान धोक्यात येईल

केंद्र सरकारने तयार केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून शेतकरी आंदोलन करत असले तरी हे तीनही कायदे मागे घेणे शक्य नाही. प्रत्येक कायद्याला विरोध होत असतो. मात्र ते कायदे मागे घेतल्यास संविधान धोक्यात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तर पालघरमध्ये प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदरामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध करू नये, असं सांगत आठवलेंनी वाढवण बंदराच समर्थन केलं.

नो कोरोना नो…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘गो कोरोना गो’, ‘गो कोरोना गो’, अशी कविता मी लिहिली होती. मात्र त्यांनतर मलाही कोरोना झाला, असं सांगत त्यांनी ‘नो कोरोना नो’, ‘नो कोरोना नो’चा नाराही दिला. (ramdas athawale criticized maha vikas aghadi over Aurangabad rename issue)

 

संबंधित बातम्या:

कर नाही त्याला डर कशाला, ईडीविरोधातील ‘त्या’ चर्चांना संजय राऊतांकडून ब्रेक

अशोक चव्हाणांच्या कर्तृत्वामुळे मराठा समाजावर ही वेळ, विनायक मेटेंची टीका

नाव बदलून शहरांचा विकास होत नसतो, त्यामुळं राजकारण करु नये, पण… : प्रवीण दरेकर

(ramdas athawale criticized maha vikas aghadi over Aurangabad rename issue)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI