AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर नाही त्याला डर कशाला, ईडीविरोधातील ‘त्या’ चर्चांना संजय राऊतांकडून ब्रेक

शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. (Sanjay Raut Comment on Shivsena aggressive stance against ED)

कर नाही त्याला डर कशाला, ईडीविरोधातील 'त्या' चर्चांना संजय राऊतांकडून ब्रेक
Sanjay raut
| Updated on: Jan 03, 2021 | 5:30 PM
Share

 मुंबई : “बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, कर नाही त्याला डर कशाला?” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. (Sanjay Raut Comment on Shivsena aggressive stance against ED)

गेल्या काही दिवसांपासून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांवर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. 

शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच.तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ED कडून शिवसेना नेत्यांना नोटीस बजावण्यात येत होत्या. त्यातच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहितीही समोर येत होती. मात्र या सर्व चर्चांना संजय राऊतांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. पण पुढे या प्रकरणाचा तपास EDकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकांऊटमधून पैसे ट्रान्सफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Sanjay Raut Comment on Shivsena aggressive stance against ED)

संबंधित बातम्या : 

शिवसेना ED विरोधात आक्रमक, 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

Follow Us
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?