रामदास आठवले यांची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमधील घटक पक्षांकडे शिर्डी लोकसभेची जागा मागितली होती. पण या जागेवर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. त्यामुळे महायुतीकडून पुन्हा सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रामदास आठवले नाराज असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

रामदास आठवले यांची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?
रामदास आठवले यांची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?
| Updated on: Mar 31, 2024 | 11:35 PM

“माझी शिर्डीत उभं राहण्याची इच्छा होती. मी 2009 मध्ये हरलो होतो. एखादी जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीही आग्रह केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आलेले त्यांना आश्वासन दिले होते की आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी खासदार होते. त्यामुळे प्रयत्न करूनही ती जागा सोडली नाही. आमचं 2026 राज्यमंत्रीपद संपतं. ते कंटिन्यू करण्याचं आश्वासन देत केंद्रात राज्यमंत्री आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठीही प्रयत्न करत असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणीस यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर विस्तार झाले की मंत्रिपद आणि एमएलसी (विधान परिषदेची आमदारकी) देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. महामंडळात चेअरमन आणि दोन वेगवेगळी पदं यामध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल. हे सर्व बोलणं आमचे मान्य केल्यामुळे जी नाराजी आमच्यामध्ये होती ती मिटली आहे”, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

“सरकार आपल्या दारी कार्यक्रमात तीन पक्षाचे झेंडे दिसतात. आमचा झेंडा दिसत नाही. याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि त्यावर ती दुरुस्ती करून आरपीआयला मान दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. दहा वर्षाच्या कालावधीत जी काम केलेली आहेत त्यामुळे महायुतीसोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील”, असं रामदास आठवले म्हणाले.

‘देशाचे संविधान कोणी बदलू शकत नाही’

“देशाचे संविधान कोणी बदलू शकत नाही आणि बदलणारही नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरलेल्या जातात, तरी त्या मंत्रिमंडळात मी आहे. संविधानाला हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे. देवेंद्र फडणीस यांनी आश्वासन दिलं आहे. आरपीआय महायुतीत आहे. त्यांनी आमचा विचार केलाय. मात्र जागेची अडचण आहे, असं आम्हाला सांगितलं आहे. शिर्डीच्या जागेसाठी आग्रही होतो. मात्र ती त्यांना सोडता आली नाही. मात्र बाकीचे आश्वासन त्यांनी दिलेले आहेत. ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.

रामदास आठवलेंचं तरुणांना आवाहन

“सध्याच्या परिस्थितीत इंडिया आघाडी आहे फक्त अफवा पसरवायचं काम करते समाजामध्ये भारत जोडो यात्रा काढत असताना भारत तोडण्याचे काम करतात. काँग्रेसच्या हातात इतके वर्षे सत्ता होती. तरी त्यांनी कुठली कामे केली नाहीत. बाबासाहेबांची कामे पूर्ण केली नाहीत. यामुळे इंडिया आघाडी बरोबर जायचा प्रश्नच येत नव्हता. तरुणांना माझं आवाहन आहे की आपण शॉर्ट टर्मचा विचार न करता लाँग टर्मचा विचार करावा. परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही. आज बीजेपीमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले. बीजेपी 1982 मध्ये दोन हजाराची होती. ती 303 ची झालेली आहे. भाजपला सर्वांची मतं मिळत आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. भाजप पक्ष सर्व जाती-धर्माचा आहे. तरी कोणी काय बोलले संविधानावर त्यावर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं.